Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव, आठ मुलांसह 18 जणांचा मृत्यू; शेल्टर होममध्ये 10 लाख लोक

Israel-Hamas War: इस्रायलने हमासचा खात्मा करण्याची शपथ घेतली असताना, हमासही या रणांगणात शस्त्रे टाकायला तयार नाही.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबत नाही. इस्रायलने हमासचा खात्मा करण्याची शपथ घेतली असताना, हमासही या रणांगणात शस्त्रे टाकायला तयार नाही. इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील डझनभर पॅलेस्टिनी मारले गेले. त्याचवेळी, उत्तरेकडील अल शिफा रुग्णालयाच्या आसपासचा परिसर आणि दक्षिणेकडील रफाह, जिथे दहा लाखांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे, त्यांनाही लक्ष्य करण्यात आले.

दरम्यान, गाझा पट्टीच्या उत्तरेकडील अल शिफा रुग्णालय परिसरात एका आठवड्याहून अधिक काळ भीषण लढाई सुरु आहे. हसीराच्या कुटुंबातील सदस्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाजवळील हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले. इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांनी शेकडो हमासचे दहशतवादी ठार केले. रुग्णालयाचा ढाल म्हणून वापर करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना अटकही केली आहे.

दुसरीकडे, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी माहिती दिली होती की गाझा पट्टीतील सुमारे 60,000 गर्भवती महिला कुपोषणाचा सामना करत आहेत. मंत्रालयाने यावर भर दिला की, महिलांना पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी 49 टक्के महिला आहेत, ज्यामध्ये डिलीवरी होणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण आहे. गोळीबार आणि हल्ल्यांमुळे घर सोडावे लागल्यानंतर महिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गाझामध्ये दर महिन्याला सुमारे 5,000 महिला मुलांना जन्म देत आहेत.

यूएननेही चिंता व्यक्त केली

यापूर्वी, 19 फेब्रुवारी रोजी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड युनिसेफने गाझामधील मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्या कुपोषणात लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानंतर झालेल्या नरसंहारामुळे शहरातील महिला आणि मुलांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे यूएनने आपल्या अहवालात म्हटले होते.

नरसंहार थांबवण्यासाठी आवाहन करा

गाझा आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात संयुक्त राष्ट्रांना पॅलेस्टिनी महिला आणि त्यांच्या कुटुंबांवरील इस्रायली हल्ले आणि नरसंहार ताबडतोब थांबवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय संस्थांना पॅलेस्टिनी महिलांच्या (Women) आरोग्य, मानसिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 7 ऑक्टोबर 2023 पासून शहरातील 9,000 पॅलेस्टिनी महिलांच्या मृत्यूची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT