Israel-Hamas War: हमासने धुडकावला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव, इस्रायलवर केले गंभीर आरोप; म्हणाला...

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War:

इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याचदरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे. हमासने पुन्हा एकदा युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. एवढेच नाही तर हमासने इस्रायलवर गंभीर आरोपही केले. इस्रायलने महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हमासने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमासने आपल्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नवीन युद्धविरामाचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. या प्रस्तावात युद्धाचा शेवट आणि गाझामधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचा उल्लेख करण्यात आला होता. हमासने सोमवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले की, त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या देशांना सूचित केले की ते मार्चच्या सुरुवातीला निश्चित केलेल्या ठिकाणी निघून जातील. मात्र, इस्रायलने व्यापक युद्धविराम, गाझामधून (इस्रायली सैन्याची) माघार, विस्थापित लोकांचे परतणे आणि कैद्यांची अदलाबदल या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

Israel Hamas War
Israel-Hamas War: विराम संपला युद्ध सुरु! हमासने इस्रायलवर डागली 50 रॉकेट, इस्रायली सैन्याच्या कारवाईत 109 जणांचा मृत्यू

नेतन्याहू यांनी हमासची मागणी फेटाळून लावली होती

दरम्यान, हमासच्या वक्तव्यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गाझामधील ओलिसांची सुटका आणि तात्काळ युद्धविराम करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, या संदर्भात झालेल्या मतदानामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने सोमवारी मतदानात आपला 'व्हेटो' अधिकार न वापरण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वॉशिंग्टनचा नियोजित दौरा रद्द केला. त्यानंतर नेतन्याहू यांनी हमासच्या मागण्या फेटाळल्या.

Israel Hamas War
Israel-Hamas War: सुरक्षा परिषदेत इस्रायलविरोधी 4 प्रस्ताव अयशस्वी, आता 5 वा आणण्याची तयारी; जाणून घ्या काय आहे मागणी?

अमेरिकेने मतदानात भाग घेतला नाही

यापूर्वी, गाझामध्ये युद्धविरामाशी संबंधित प्रस्तावाच्या बाजूने 15 पैकी 14 सदस्यांनी मतदान केले होते. त्याचवेळी, अमेरिकेने मतदानात भाग घेतला नाही, ज्यामुळे हा प्रस्ताव सहज मंजूर झाला. दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात काही अलबेल नाही अशा चर्चा सुरु आहेत. अमेरिकेने नकार देऊनही नेतन्याहू रफाह येथे इस्रायली सैन्य पाठवण्यावर ठाम आहेत.

प्रस्तावात काय विशेष होते?

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ''सुरक्षा परिषदेने गाझाबाबत बहुप्रतिक्षित प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव तात्काळ युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी करतो. या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करावी.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com