Elon Musk And Mark Zuckerberg Dainik Gomantak
ग्लोबल

Mark Zuckerberg: एलन मस्कला मागे टाकत झुकेरबर्ग बनले जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत विक्रमी वाढ

Elon Musk And Mark Zuckerberg: एलन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकून तो जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच मार्क झुकरबर्ग यांनी एलन मस्कला मागे टाकले आहे.

Manish Jadhav

Mark Zuckerberg 3rd Richest Person In World: जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ होत आहे. यातच आता, एलन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकून ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच मार्क झुकरबर्ग यांनी एलन मस्क यांना मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती (Mark Zuckerberg Net Worth) शुक्रवारी $ 5.65 अब्जने वाढली आणि $ 187 अब्ज पोहोचली. झुकरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी 58.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. शुक्रवारी त्यांच्या संपत्तीत झालेली ही वाढ फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे झाली.

एलन मस्क यांचे खूप मोठे नुकसान

दरम्यान, शुक्रवारी मेटा शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झुकरबर्ग यांची संपत्ती $187 अब्ज आहे. तर एलन मस्क यांची एकूण संपत्ती 181 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलन मस्क यांना यावर्षी 48.4 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारीच त्यांच्या संपत्तीत 4.52 अब्ज डॉलरची घट झाली.

मार्क झुकरबर्ग चार वर्षांनंतर प्रथमच एलन मस्कच्या पुढे

दुसरीकडे, टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे मार्चपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते, परंतु आता ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत. या वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावणारे व्यक्ती एलन मस्क आहेत, तर मार्क झुकरबर्ग या वर्षी सर्वाधिक संपत्ती कमावणारे अब्जाधीश ठरले आहेत. झुकरबर्ग यांनी 16 नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच एलन मस्क यांना मागे टाकले. त्यावेळी, त्यांची एकूण संपत्ती 105.6 अब्ज डॉलर होती तर एलन मस्क यांची एकूण संपत्ती 102.1 अब्ज डॉलर होती.

एलन मस्क यांची संपत्ती का कमी होत आहे?

या वर्षभरात एलन मस्क यांच्या संपत्तीत घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे टेस्लाचे शेअर्स. 2024 मध्ये टेस्लाचे शेअर्स 34 टक्क्यांनी खाली आले आहेत. हे शेअर S&P 500 निर्देशांकातील सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर बनले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झालेली घट, चीनमधील आव्हाने आणि जर्मनीतील उत्पादन समस्या यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT