Mark Zuckerberg: बदनामी टाळण्यासाठी मार्क झुकरबर्गची कंपनी देणार 60 हजार कोटी! जाणून घ्या नेमकं प्रकरण

Cambridge Analytica Scandal: केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 6000 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
Mark Zuckerberg | Cambridge Analytica Scandal
Mark Zuckerberg | Cambridge Analytica ScandalDainik Gomantak
Published on
Updated on

Cambridge Analytica Scandal: केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 6000 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. खरे तर, 2018 मध्ये मेटाने केलेल्या खुलाशानंतर, जवळजवळ 4 वर्षे चाललेल्या खटल्याच्या सेटलमेंटसाठी $ 725 दशलक्ष देण्याचे मान्य केले आहे, जे भारतीय चलनानुसार 6000 कोटी आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणातील आरोपांनंतर कंपनीने हा मोठा निर्णय घेतला असून आता ही मोठी रक्कम देण्यास कंपनी पूर्णपणे तयार आहे.

काय आहे केंब्रिज अ‍ॅनालिटिका घोटाळा

खरे तर, फेसबुकने सुमारे 87 दशलक्ष यूजर्सचा पर्सनल डेटा सल्लागार कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकासोबत शेअर केला आहे. ज्या यूजर्सचा पर्सनल डेटा कंपनीसोबत शेअर करण्यात आला त्यांना याची माहिती नव्हती आणि त्यांच्या नकळत कंपनीने एवढे मोठे पाऊल उचलले होते. या घोटाळ्यानंतर फेसबुकवर आरोप करण्यास सुरुवात झाली होती. दुसरीकडे, या घोटाळ्याचा खरा उद्देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016 च्या अध्यक्षीय प्रचारात केंब्रिज अॅनालिटिकाचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले होते. या मोहिमेसाठी यूजर्सचा पर्सनल डेटा वापरला जाणार होता.

Mark Zuckerberg | Cambridge Analytica Scandal
Russia Ukraine War: रशियाने कमला हॅरिस, मार्क झुकरबर्ग यांना येण्यास घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात मोठी भूमिका

केंब्रिज अ‍ॅनालिटिका घोटाळ्याने डोनाल्ड ट्रम्प यांना 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. 2018 मध्ये ही बाब समोर आली होती. एवढेच नाही तर केंब्रिज अ‍ॅनालिटिकावर ब्रिटनच्या युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी झालेल्या मतदानात फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिका आणि फेसबुकचा हा मोठा घोटाळा केंब्रिज अ‍ॅनालिटिकामध्ये कर्मचारी असलेल्या क्रिस्टोफर वायलीच्या संपत्तीवरुन उघड झाला होता. मात्र, या तोडग्याचा अर्थ मेटाने आपली चूक मान्य केली असे नाही. तरीही प्रकरण दडपण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com