Canada Hate Crime Dainik Gomantak
ग्लोबल

Canada Hate Crime: कॅनडात मोठा गदारोळ, मशिदीबाहेर धार्मिक अपशब्द बोलण्यावरुन...

Canada Hate Crime: संशयिताची ओळख पटली आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले.

Manish Jadhav

Canada Hate Crime: ओंटारियो येथील एका मशिदीत द्वेषाने प्रेरित केलेल्या घटनेच्या संदर्भात एका 28 वर्षीय तरुणाला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या तरुणावर लोकांना धमकावणे आणि धार्मिक लोकांचा अपमान केल्याचा आरोप आहे. शरण करुणाकरनने पहिल्यांदा एका व्यक्तीवर वाहन चालवले, नंतर धमकावले आणि धार्मिक अपशब्दांचा वापर केला.

त्याने पार्किंगमध्ये धोकादायकपणे गाडी चालवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. संशयिताची ओळख पटली आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले.

टोरंटोमध्ये संशयित पकडला गेला

मध्यरात्रीनंतर, 7 एप्रिल रोजी, यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी (Police) इंटेलिजन्स युनिट आणि हेट क्राइम युनिटच्या मदतीने टोरंटोमध्ये संशयितास अटक केली.

'इस्लामफोबियाने प्रेरित झालेल्या हल्ल्यांमध्ये वाढ होणे अत्यंत चिंताजनक आहे'

मंत्री अहमद हुसैन यांनी सांगितले की, मला खूप दुःख झाले आहे. ते पुढे म्हणाले की, 'मला रमजानच्या पवित्र महिन्यात 6 एप्रिल रोजी मारखमच्या इस्लामिक सोसायटीच्या बाहेर द्वेषाने प्रेरित झालेल्या हल्ल्याने खूप दुःख झाले आहे.

इस्लामोफोबियाने प्रेरित होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण अतिशय चिंताजनक असून आपण त्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे. आम्ही द्वेषाला जिंकू देणार नाही.'

'कॅनडियन समाजात द्वेषाला स्थान नाही'

कॅनडाच्या (Canada) व्यापार मंत्री मेरी एनजी यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले की, कॅनडाच्या समाजात द्वेषाला स्थान नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT