Hindu Temple Vandalised In Canada
Hindu Temple Vandalised In CanadaDainik Gomantak

Canada Hindu Temple Vandalised: कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा!

Canada News: विंडसर पोलिसांनी या तोडफोडीचा 'द्वेषपूर्ण घटना' म्हणून तपास सुरु केला असून पोलिस दोन संशयितांचा शोध घेत आहेत.
Published on

Hindu Temple Vandalised In Canada: कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

यावेळी ओंटारियोमधील विंडसर येथे असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. विंडसर पोलिसांनी या तोडफोडीचा 'द्वेषपूर्ण घटना' म्हणून तपास सुरु केला असून पोलिस दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

विंडसर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, '5 एप्रिल 2023 रोजी, द्वेषाने प्रेरित झालेल्या तोडफोडीच्या अहवालानंतर अधिकाऱ्यांना नॉर्थवे अव्हेन्यूच्या 1700 ब्लॉकमधील हिंदू मंदिरात पाठवण्यात आले.

यावेळी, अधिकाऱ्यांना इमारतीच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदूविरोधी (Hindu) आणि भारतविरोधी भित्तिचित्रे आढळून आली.'

Hindu Temple Vandalised In Canada
Canada New Rules: कॅनडामध्ये 'या' लोकांवर घरं खरेदी करण्यावर सरकारची बंदी

दरम्यान, तपासात पोलिस अधिकाऱ्यांना एक व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये दोन संशयित रात्री 12 नंतर (स्थानिक वेळेनुसार) दिसत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, 'व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा पाळत ठेवून आहे.'

यापूर्वीही हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते

कॅनडात हिंदू मंदिराची तोडफोड होण्याची आणि त्याच्या भिंतींवर भारतीविरोधी घोषणा लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये कॅनडातील मिसिसॉगा येथील राम मंदिराची तोडफोड करण्यात आली होती आणि भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंदिराच्या विटंबनेचा निषेध केला आणि कॅनडाच्या (Canada) अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करुन दोषींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली.

Hindu Temple Vandalised In Canada
Canada: दिवाळीच्या जल्लोषात खलिस्तान समर्थक आणि भारतीय भिडले; झाला मोठा राडा

जानेवारीमध्ये, ब्रॅम्प्टनमधील एका हिंदू मंदिराची भारतविरोधी भित्तिचित्रे विद्रुप करण्यात आली, ज्यामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली.

टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गौरी शंकर मंदिराच्या तोडफोडीचा निषेध केला होता. असे म्हटले होते की, या कृत्याने कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही मंदिराच्या तोडफोडीचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com