A major attack on Pakistan predicted 
ग्लोबल

Pakistan: देशाला उद्धवस्त करणारा हल्ला होणार, ओसामा खानच्या भविष्यवाणीने पाकड्यांची उडाली झोप; एअरस्पेस केला बंद

Pakistan Astrologer: ज्योतिषाने यापूर्वी ऑपरेशन सिंदूर, आणि पूर्व पाकिस्तानमध्ये आलेल्या पूराची भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

इस्लामाबाद: पाकिस्तानी ज्योतिषाने केलेल्या धक्कादायक भविष्यवाणीनंतर पाकिस्तानी नागरिक आणि सरकारची झोप उडाली आहे. प्रसिद्ध ज्योतिषी ओसामा अली खान याने पाकिस्तानवर भीषण हल्ला होणार असून, यात देश उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त केली आहे. खानने चार महत्वाच्या तारखा देखील जाहीर केल्या असून, पाकिस्तान सरकारने याची दखल घेत, चक्क एअरस्पेस बंद केला आहे.

भारताशी पंगा घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ तळांवर हल्ला करत त्यांना उद्धवस्त केले. यानंतर आता पुन्हा पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला होण्याची भीती आहे. ज्योतिषी खान यांने केलेल्या भविष्यवाणीनुसार, यावेळी होणारा हल्ला गेल्या वेळच्या हल्लाच्या तुलनेत भयानक असेल, असे त्याने म्हटले आहे. ज्योतिषाने ऑपरेशन सिंदूर, आणि पूर्व पाकिस्तानमध्ये आलेल्या पूराची भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

यामुळे ओसामाच्या नव्या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये चिंतेची वातावरण आहे. सरकारने देखील याची दखल घेत १६ ते २३ जुलै या काळासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यावेळी हल्ला भारत नव्हे तर इस्त्रालय कर शकतो अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाकड्यांची भीती अधिक पटीने वाढली आहे. पाकिस्तानकडे अणुशक्ती आणि मोठे सैन्य असल्याने इस्त्रायसाठी डोकेदुखी असल्याचा तर्क पाकिस्तानी पत्रकाराने लावला आहे.

या पत्रकाराने पाकिस्तानी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इस्त्रायलचा मुख्य निशाणा पाकिस्तान असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर गाझा, सिरिया, लेबनॉन आणि इराण यासारख्या देशांवर इस्त्रायल करत असलेला हल्ला ही केवळ दिशाभूल आहे. इस्त्रायलचा मुख्य निशाणा पाकिस्तान असल्याचा दावा या पत्रकाराने केला आहे. आता या पत्रकाराचा दावा आणि ज्योतिषाची भविष्यवाणीत किती दम आहे हे येत्या काळातच सिद्ध होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

SCROLL FOR NEXT