Liverpool star Diogo Jota dies in car crash 10 days after wedding: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू डिएगो जोटा याच्या मृत्यूच्या वृत्तानंतर पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने (Portuguese Football Federation) याबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे. जोटाच्या कार अपघातातील निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर फेडरेशनने तातडीने यावर स्पष्टीकरण दिले.
लिव्हरपूल फुटबॉल क्लबकडून (Liverpool Football Club) खेळणारा २८ वर्षीय फॉरवर्ड खेळाडू डिएगो जोटा याचा ३ जुलै रोजी एका दुःखद कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातात डिएगोच्या भावाचाही मृत्यू झाला. डिएगो जोटाचे 10 दिवसांपूर्वीच २२ जून रोजी रुथ कार्डोसोशी लग्न झाले होते.
हा कार अपघात झाला स्पॅनिश शहरातील झमोरा येथे होता. स्थानिक वेळेनुसार रात्री १२:४० च्या सुमारास हा अपघात झाला. कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि आग लागली, ज्यामुळे डिएगो आणि त्याच्या भावाचा मृत्यू झाला.
डिएगो जोटाचा (Diogo Jota) धाकटा भाऊ आंद्रे देखील एक फुटबॉल खेळाडू होता. तो पोर्तुगालच्या दुसऱ्या लीगमध्ये पेनाफिलचे प्रतिनिधित्व करत होता आणि अपघाताच्या वेळी तो कारमध्ये होता. स्पॅनिश सिव्हिल गार्डने दिलेल्या निवेदनात असे उघड झाले आहे की दोन्ही भाऊ लॅम्बोर्गिनीमध्ये होते आणि ओव्हरटेक करताना कारचा टायर फुटल्याने कारला आग लागली आणि अपघात झाला.
जोटाच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर, पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने त्याच्या कार अपघाताबद्दलच्या निवेदनात याची पुष्टी केली. फेडरेशनचे अध्यक्ष पेड्रो प्रोएन्का यांनी त्यांच्या निवेदनात माहिती दिली की पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन आणि संपूर्ण पोर्तुगीज फुटबॉल चाहते आज सकाळी स्पेनमध्ये डिओगो जोटा आणि आंद्रे सिल्वा यांच्या निधनाने पूर्णपणे धक्का बसला आहे.
राष्ट्रीय अ संघासाठी जवळजवळ ५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा एक अद्भुत खेळाडू असण्यापेक्षा, डिओगो जोटा हा एक असाधारण व्यक्ती होता. त्याचे सर्व सहकारी आणि विरोधक त्याचा आदर करत असत, तो नेहमीच आनंदी असायचा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.