'Leave my kids alone', Donald Trump angered by calling children to testify in fraud case. Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: 'माझ्या मुलांना तरी सोडा', फसवणूक प्रकरणात साक्ष देण्यासाठी मुलांना बोलावल्याने ट्रम्प संतापले

Ashutosh Masgaunde

'Leave my kids alone', Donald Trump angered by calling children to testify in fraud case:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दिवाणी फसवणूक प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ट्रम्प यांच्या दोन मुलांनाही साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

ज्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत न्यायाधीशांवर संताप व्यक्त करत, आपल्या मुलांना या प्रकरणात ओढायला नाही पाहिजे, असे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा मोठा मुलगा डॉन जूनियर (वय ४५ वर्ष) आणि धाकटा मुलगा एरिक ट्रम्प (वय ३९ वर्ष) यांना या आठवड्यात फसवणूक प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले आहे.

मुलांना साक्ष देण्यासाठी बोलावण्याच्या न्यायाधीश आर्थर अँग्रॉन यांच्या निर्णयावर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट्स केल्या.

या पोस्ट्समध्ये ट्रम्प यांनी अँग्रॉनला राजकीय हँगर म्हटले आणि ते डेमोक्रॅट पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप केला.

ट्रम्प यांनी लिहिले की, 'अँग्रॉन वेडा आहे आणि खूप धोकादायक आहे. माझ्या मुलांना यामध्ये ओढू नको आंग्रोन, तू कायदेशीर व्यवसायावर डाग आहेस.'

डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डॉन ज्युनियरला बुधवारी आणि एरिक ट्रम्पला गुरुवारी साक्ष देण्यासाठी बोलावले जाऊ शकते.

दोघेही ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. ट्रम्प ऑर्गनायझेशन जगभरातील उंच निवासी आणि कार्यालयीन इमारती तसेच लक्झरी हॉटेल्स आणि गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन करते.

काय प्रकरण आहे?

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मुलांवर बँकांकडून कर्ज आणि विमा मिळविण्यासाठी समूहाच्या मालमत्तेच्या मूल्यात अब्जावधी डॉलर्सची फेरफार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी ट्रम्प यांची ५ नोव्हेंबरला चौकशी होऊ शकते. तसेच मुलगी इवांका ट्रम्प यांचीही लवकरच चौकशी होऊ शकते. इवांका या प्रकरणात आरोपी नसल्या तरी त्या पूर्वी कौटुंबिक व्यवसायात सहभागी होती, त्यामुळे तिचीही चौकशी केली जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यवसाय धोक्यात

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून बँका, आणि विमा कंपन्यांचे संपूर्ण पैसे भरल्याचे म्हटले आहे. माझ्याशिवाय या प्रकरणात कोणीही पीडित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी कायदेशीर अधिकाऱ्यांवर भाष्य केल्याबद्दल ट्रम्प यांना यापूर्वी पाच हजार ते दहा हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या फसवणुकीच्या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना 250 दशलक्ष डॉलर्सचा दंड होऊ शकतो आणि त्यांच्या मुलांना व्यवस्थापनामधून काढून टाकले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT