Lakhbir Singh Rode Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला खलिस्तानी दहशतवादी Lakhbir Singh Rodeचा मृत्यू

Khalistani Terrorists: लखबीर सिंग हा पाकिस्तानात बसून आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात खलिस्तानी कारवायांमध्ये सामील होता. तो अमली पदार्थ, शस्त्रे, टिफिन बॉम्ब आणि स्फोटके पाकिस्तानातून पाठवत होता.

Ashutosh Masgaunde

Khalistani terrorist Lakhbir Singh Rode, who was hiding in Pakistan, died:

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा मृत्यू झाला आहे. ७२ वर्षीय लखबीर सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुप्तचर यंत्रणांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.

लखबीर सिंग रोडे हा खलिस्तानी दहशतवादी होता आणि जर्नेल सिंग भिंद्रनवालेचा पुतण्या होता. तो इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा प्रमुख देखील होता, ही संघटना कॅनडासह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये पसरलेली आहे.

यासोबतच लखबीर सिंग रोडे हा बंदी घातलेल्या खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा प्रमुख होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लखबीर सध्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहत होता.

लखबीर सिंग रोडे याला एकदा नेपाळमध्ये २० किलो आरडीएक्ससह अटक करण्यात आली होती, मिळालेल्या माहितीनुसार त्याला हे आरडीएक्स पाकिस्तानातून मिळाले होते.

खलिस्तानी दहशतवाद्याने २०२१ मध्ये लुधियाना कोर्टात बॉम्बस्फोटाची योजना आखली होती. लखबीर सिंग दुबईमार्गे पाकिस्तानात पळून गेला होता, परंतु त्याचे कुटुंब कॅनडामध्ये राहत आहे. भारताने 2022 मध्ये पाकिस्तानला सोपवलेल्या 20 दहशतवाद्यांच्या यादीत रोडेचे नावही होते.

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग हा पाकिस्तानात बसून आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात खलिस्तानी कारवायांमध्ये सामील होता. तो अमली पदार्थ, शस्त्रे, टिफिन बॉम्ब आणि स्फोटके पाकिस्तानातून पाठवत होता.

या सर्वांसह अनेक व्हीव्हीआयपी लोकांच्या टार्गेट किलिंगमध्येही त्याचा सहभाग होता. अलीकडे तो पंजाबमधील बड्या गुंडांच्या साथीने दहशतवादी आणि गुन्हेगारी घटना घडवत होता.

त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएने नुकतीच त्याची मोगा येथील जमीन जप्त केली होती. एनआयए त्याच्याविरुद्ध दहशतवादाशी संबंधित 6 प्रकरणांचा तपास करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात लपून बसलेला खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचे २ डिसेंबर रोजी पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

ही बातमी फुटू नये म्हणून लखबीर सिंग रोडे याच्यावर पाकिस्तानात शीख प्रथेनुसार गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

SCROLL FOR NEXT