Pakistan Prime Minister Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

काश्मीरी लोकांना स्वतंत्र राहण्याचा पूर्ण अधिकार- इम्रान खान

दैनिक गोमन्तक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir) निवडणूक रॅलीसाठी आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी एक नवीन पर्याय ऑफर केला आहे. शुक्रवारी ते म्हणाले की काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे की त्यांना "स्वतंत्र राज्य" बनवायचे आहे हे ठरविण्यास सक्षम असतील. या दरम्यान, काश्मीरला स्वतंत्र प्रांत बनविण्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या योजनेचा दावा फेटाळला. तथापि, पाकव्याप्त जम्मू-काश्मीर हा "भारताचा एक अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील" असा भारताने नेहमीच आग्रह धरलेला आहे.

25 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीच्या प्रचारासाठी तारार खाल येथे आल्यानंतर पंतप्रधानथ खान यांनी झालेल्या खान यांनी काश्मीरला पाकिस्तानचा प्रांत बनवण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले एक दिवस असा येईल की, काश्मीरी नागरिकांना त्यांचे स्वता:चे भविष्य ठरवण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या आधारे आपले भविष्य ठरवण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि त्यानंतर काश्मीरमधील लोक त्या दिवशी पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा एकमताने निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या नेते मरियम नवाज यांनी 18 जुलै रोजी पीओकेमध्ये आयोजित केलेल्या निवडणूक मेळाव्यात सांगितले की काश्मिरची स्थिती बदलून आम्ही त्याला स्वतंत्र प्रांत बनविण्याचा निर्णय लवकरचं घेऊ. त्याचवेळी इम्रान खान म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या सार्वमतानंतर त्यांचे सरकार आणखी एक सार्वमत घेईल. यात काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानबरोबर रहायचे की स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना देण्यात येईल.

काश्मीरबाबत पाकिस्तानने जाहीर केलेल्या धोरणानुसार हा मुद्दा संयुक्त च्या ठरावानुसार एका सबबिसिटाद्वारे सोडवला गेला पाहिजे. यामध्ये काश्मिरींना भारत किंवा पाकिस्तान यांच्यात निवड करण्याची परवानगी देण्यात येईल.

विशेष म्हणजे यूएनच्या ठरावांमध्ये तिसरा पर्याय नाही. तर पीएम खान यांनी घोषित धोरणाव्यतिरिक्त तिसर्‍या पर्यायाबद्दल बोलले आहेत. जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त, जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्द्यांचा अंतर्गत विषय असून आपले प्रश्न सोडविण्यास आम्ही सक्षम आहोत असंही भारताने स्पष्ट केले आहे. असेही इस्लामाबादला नवी दिल्लीतून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT