पाकिस्तान उझबेकिस्तानच्या मदतीने 'बाबर' वर बनवणार चित्रपट !

'महान मुघलं शासकापैंकी एक पहिले जहीरुद्दीन बाबर (Zaheeruddin Babara) यांच्यावर चित्रपट बनवण्याचा आम्ही आता निर्णय घेतला आहे ते फारच रोमांचक आहेत.'
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

इतिहास (History) वर्तमानामध्ये मानवी स्मृतींना उजाळा देतो त्याचबरोबर काही शिकण्याच्या प्रवृत्तींना ही अंलकृत करत असतो. मात्र आता शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने चक्क मुघल शासक बाबरवर सिनेमा बनवण्यासाठी उझबेकीस्तानची मदत घेतली आहे.

Pakistan Uzbekistan Will Make Film on Babar:

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी घोषणा केली आहे की इस्लामाबाद (Islamabad) आणि ताश्कंद (Tashkent) (उझबेकिस्तानची राजधानी) पहिल्या मुघल शासक जहीरुद्दीन बाबरवर (Zaheeruddin Babara) चित्रपट बनवेल. जेणेकरुन दोन देशांमधील सामायिक वारशाबद्दल युवकांना शिक्षित करता येईल. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत (Shavkat Mirziyoyev) मिर्झीयोयेव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत इम्रान खान म्हणाले की, 'महान मुघलं शासकापैंकी एक पहिले जहीरुद्दीन बाबर यांच्यावर चित्रपट बनवण्याचा आम्ही आता निर्णय घेतला आहे ते फारच रोमांचक आहेत.'

Imran Khan
पाकिस्तान ग्रे यादीतच... आर्थिक नाकेबंदी जैसे थे

पंतप्रधान खान पुढे म्हणाले, बाबरच्या घराण्याने 300 वर्षे भारतवर राज्य केले, बाबरच्या काळात भारत हा जगात सर्वात श्रीमंत होता (इस्लामाबाद ताशकंद फिल्म). खान पुढे म्हणाले, "मला वाटते की उझबेकिस्तान आणि पाकिस्तानच्या युवकांना मुघल शासक बाबरपासून असलेल्या शेकडो वर्षांच्या संबंधाविषयी जाणून घेता येणार आहे. जगातील या भागाच्या आणि आपल्या भागाच्या संबंधाची परिपूर्णता समजून घेता येईल. दरम्यान अस्तित्त्वात असलेल्या संबंधांबद्दल आपणाला माहिती असली पाहिजे." हा चित्रपट आणि मिर्झा गालिब, अल्लामा इक्बाल, इमाम बुखारी यांच्यावर बनवण्यात आलेले चित्रपट हे या दोन्ही देशातील लोकांना जोडण्याचा पूल असणार आहे.

Imran Khan
पाकिस्तान दहशतवाद्यांना देतोय पेन्शन; भारताचा 'पाक' वर निशाणा

सांस्कृतिक देवाणघेवाणची सुरुवात

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की ही दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणची सुरूवात होईल. दोन्ही देशामधील संबंध जस जशे संबंध दृढ होत जातील तसतसे मी उझबेकिस्तानच्या लोकांना क्रिकेटची ओळख करुन देईन. 'त्याच बरोबर अध्यक्ष मिर्झीयोयेव यांनी इम्रान खान यांच्या मताचे समर्थन केले आणि दोन्ही देशांमधील तरुणांना बाबरच्या काळाशी संबंधित असलेली संस्कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. . (बाबर चित्रपटावरील इम्रान खान). ते म्हणाले की, इस्लामाबादमध्ये मशिदी, समाधी आणि शाळा त्यांच्या पूर्वजांनी बनविल्या आहेत हे देशातील फारच थोड्या तरुणांना माहिती आहे.

Imran Khan
चीन, पाकिस्तान वाढवतायेत परमाणु शक्ती, भारताला धोका ?

मिर्झिओयेव यांना पाकिस्तानला जायचेयं

उझबेकिस्तानचे अध्यक्ष म्हणाले, 'आम्ही असे म्हणू शकतो की ही केवळ एक सुरुवात आहे. जिथे आपल्या पूर्वजांच्या खुणा आहेत अशा जागा पाहण्यासाठी मी पाकिस्तानला जाण्याची वाट पाहत आहे. एफएटीएफ (पाकिस्तान उझबेकिस्तान रिलेशनशिप) च्या करड्या यादीमुळे याचा वाईट परिणाम होत आहे. व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com