Canada PM Justin Trudeau Dainik Gomantak
ग्लोबल

Justin Trudeau: 'जर शक्तिशाली देशांनी असे केले तर जग धोकादायक होईल...', निज्जर हत्येवर ट्रूडो पुन्हा बडबडले

Canada Prime Minister Justin Trudeau: जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर जे आरोप केले होते, त्याच जुन्या आरोपांची पुन्हा पुनरावृत्ती केली.

Manish Jadhav

Canada Prime Minister Justin Trudeau: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा भारतावर बेताल आरोप केले आहेत.

एका पत्रकाराने ट्रुडो यांना विचारले की, कॅनडाच्या भूमीवर आपल्याच नागरिकाच्या (निज्जर) हत्येच्या तपासात काय प्रगती आहे आणि जर प्रगती झाली नाही तर अमेरिकेने कॅनडाच्या बाजूने भारताबाबत कठोर भूमिका घ्यावी का? याला प्रत्युत्तर म्हणून जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर जे आरोप केले होते, त्याच जुन्या आरोपांची पुन्हा पुनरावृत्ती केली.

जस्टिन ट्रुडो म्हणाले की, 'कॅनडाच्या (Canada) भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील होते. याप्रकरणी आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन केले.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत.'

'कॅनडाने नेहमीच कायद्याचे पालन केले'

ट्रुडो म्हणाले की, 'आम्ही आमच्या सर्व मित्र आणि भागीदारांसोबत काम करत राहू, तपास यंत्रणा त्यांचे काम करत राहतील.' ते पुढे म्हणाले की, 'कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. जर ताकदीच्या जोरावर योग्य-अयोग्य ठरवले जात असेल, बड्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक बनेल.'

जस्टिन ट्रुडो म्हणाले- भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले

कॅनडाचे खासदार चंदन आर्य यांनी पार्लमेंट हिलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना आमंत्रित करण्याच्या प्रश्नावर जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'आम्ही या गंभीर प्रकरणावर भारतासोबत रचनात्मकपणे काम करु.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि जगभरातील आमच्या भागीदारांशी संपर्क साधला आहे. म्हणूनच जेव्हा भारताने (India) व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले तेव्हा आम्ही खूप निराश झालो.'

'कॅनडीयन राजनयिकांची भारताने हकालपट्टी करणे ही चिंतेची बाब'

जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'आमच्या दृष्टीकोनातून विचार करा. कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असू शकतात असे मानण्याची आमच्याकडे गंभीर कारणे आहेत. आणि यावर भारताची प्रतिक्रिया म्हणजे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे उल्लंघन करुन कॅनेडियन राजनयिक टीमची हकालपट्टी करण्यात आली.

जगभरातील देशांसाठी ही चिंतेची बाब आहे. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की, आपले राजनयिक दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते.'

'या मुद्द्यावर भांडण नको, भारतासोबत काम करत राहू'

ट्रुडो म्हणाले की, 'आम्ही प्रत्येक पावलावर भारतासोबत रचनात्मक आणि सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे करत राहू. याचा अर्थ आम्ही भारत सरकारच्या राजनयिकांसोबत काम करत राहू.'

ट्रूडो पुढे असेही म्हणाले की, 'आम्हाला या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. मात्र आम्ही कायद्याच्या पाठीशी नेहमीच उभे राहू. कारण कॅनडाचा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे.'

हरदीप सिंग निज्जर याची यावर्षी 19 जून रोजी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंग परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. निज्जरला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT