Justin Trudeau: फक्त खलिस्तानी मुद्दा नव्हे महिला खासदाराला स्पर्श करण्यासह विविध पाच वादात अडकलेत जस्टिन ट्रूडो

India Canada Row latest Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.
 Canada PM Justin Trudeau
Canada PM Justin TrudeauDainik Gomantak
Published on
Updated on

India Canada Row latest Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

भारतासोबतचे संबंध बिघडवणे हे कोणत्याही प्रकारे कॅनडाच्या हिताचे नसले तरी याचे कारण सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की, टुडो वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. चला तर मग जाणून घेऊया जस्टिन ट्रुडो यांच्याशी संबंधित काही मोठ्या वादांबद्दल...

ट्रुडोंचा राजकीय प्रवास आणि वाद

टुडो यांचा राजकीय प्रवास 2008 मध्ये सुरु झाला. लिबरल पक्षाच्या तिकिटावर पापिनौ मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आणि संसदेत पोहोचले. या विजयानंतर ट्रुडो यांची एप्रिल 2013 मध्ये लिबरल पक्षाचे नेते म्हणून निवड झाली.

4 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांनी कॅनडाचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. वयाच्या 43 व्या वर्षी ट्रुडो यांनी ही जबाबदारी स्वीकारली तेव्हा ते देशाचे यूथ आयकॉन बनले होते.

त्यानंतर, 2011, 2015, 2019 आणि 2021 मध्ये सलग निवडणुका (Elections) जिंकून ते कॅनडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा चेहरा बनले. पण सत्तेची नशा चढली की भल्याभल्यांचा तोल जातो, असं म्हणतात.

कारण ट्रुडोशी संबंधित ज्या वादांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते जाणून घेतल्यानंतर तुमचे मनही हेलावून जाईल.

 Canada PM Justin Trudeau
Canada India Tension: कॅनडा किंवा भारत यापैकी जर एकाला निवडायचे असेल तर अमेरिका नक्कीच 'या' देशासोबत असेल...

ट्रुडो या मोठ्या वादांनी घेरले होते

ट्रूडो यांनी महिला खासदाराला टच केला होता:

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही घटना 'एल्बोगेट' म्हणून प्रसिद्ध आहे. मे 2016 मध्ये कॅनडाच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एक वेळ जस्टिन ट्रुडो यांना असे वाटले की विरोधी खासदार काम बंद पाडण्याची रणनीती अवलंबत आहेत, म्हणून ते एका खासदाराला रोखण्यासाठी वेगाने पुढे जात होते.

यादरम्यान चुकून त्यांचा एका महिलेच्या छातीला टच होतो. मात्र, या घटनेबद्दल त्यांनी वारंवार माफी मागितली आणि सांगितले की, 'मी देखील एक माणूस आहे, माझ्याकडून नकळत ही चूक झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही याची मी खात्री देतो.'

माराजुआनावरील बंदी उठवली

2018 मध्ये, ट्रुडो सरकारने (Government) माराजुआना कायद्याअंतर्गत गांजावरील बंदी उठवली होती. या निर्णयावरही जोरदार टीका झाली होती.

 Canada PM Justin Trudeau
Canada India Tension: कॅनडाकडून भारतीय डिप्लोमॅट्सची हेरगिरी; अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, हालचालींवर लक्ष...

दोषी व्यक्तीला बोलावणे

ट्रूडो फेब्रुवारी 2018 मध्ये आपल्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर आले होते. याच प्रवासादरम्यान, 1986 मध्ये कॅनडा भेटीवर गेलेल्या भारतीय राजकारण्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या जसपाल अटवालला नवी दिल्लीत ट्रूडो यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या निमंत्रणाबाबत कॅनडाच्या शिष्टमंडळालाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते.

महिलांवरील टीका

कॅनडातील (Canada) गरीब लोकांना मदत करणे हे प्राधान्य देणार्‍या ट्रूडो यांना मार्च 2019 मध्ये स्थानिक नागरिकांची गळचेपी केल्याबद्दल माफी मागावी लागली होती.

खरे तर, एका लिबरल पार्टीच्या निधी उभारणीच्या कार्यक्रमात जिथे गरिबी आणि गरीबांच्या परिस्थितींविरुद्ध आवाज उठवला गेला, त्यावेळी ट्रूडो यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती.

एक कार्यक्रमातून महिला बाहेर पडत असताना ते म्हणाले होते की, 'तुम्ही दिलेल्या देणगीबद्दल धन्यवाद...'

 Canada PM Justin Trudeau
Canada-India: कॅनडा वादाच्या पाश्वभूमीवर वृत्तवाहिन्यांना केंद्राच्या महत्त्वपूर्ण सूचना!

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

कॅनडाच्या इन्डिपेन्डेन्ट एथिक्स कमिश्नर ऑफिसने 2019 मध्ये दावा केला की, ट्रूडो यांच्या टीमने नैतिक नियमांचे उल्लंघन केले आहे.

वॉचडॉगच्या म्हणण्यानुसार, PM आणि त्यांच्या अधिकार्‍यांनी बांधकाम कंपनी SNC-Lavalin Group Inc वर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवण्याचा 2018 चा आदेश निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न ट्रुडो यांनी केला होता.

त्यावेळी, ट्रुडो यांनी आपण नोकऱ्या वाचवत असल्याचे सांगत या आरोपाबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. याशिवायही त्यांचे नाव अनेक वादात समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com