Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या, महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी...

Manish Jadhav

Non Bailable Arrest Warrant Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सोमवारी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. डॉनने ही माहिती दिली आहे.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांनी महिला न्यायाधीशांना धमकावल्याच्या आरोपावरील सुनावणीदरम्यान हजर राहिले नाहीत.

दरम्यान, दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानी निकाल दिला. इम्रान खान यांनी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली, जी न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायालयाने पोलिसांना इम्रान खान (Imran Khan) यांना 29 मार्चपूर्वी हजर करण्याचे आदेश दिले आहेत. जिओ न्यूजच्या माहितीनुसार, इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरने लाहोरला पोहोचले आहेत.

दुसरीकडे, गतवर्षी इम्रान खान संसदेत अविश्वास ठराव हरले होते, त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. इम्रान खान पुन्हा एकदा न्यायालयात (Court) सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत.

याशिवाय, त्यांनी याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी न्यायाधीशांसमोर वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट मागितली होती. त्यांनी व्हिडीओ कॉन्परन्सद्वारे सुनावणीला उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती.

तसेच, सुनावणीदरम्यान पीटीआय चीफचे वकील इंतेझार हैदर म्हणाले की, 71 वर्षीय इम्रान खान यांच्यासाठी इस्लामाबाद सुरक्षित नाही आणि त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

तत्पूर्वी, सत्र न्यायालयाने पीटीआय प्रमुखांचा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने सांगितले होते की, जर इम्रान खान आज न्यायालयात हजर झाले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाईल.

यानंतर न्यायालयाची सुनावणी दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. न्यायाधीश झेबा चौधरी यांना धमकावल्याप्रकरणी पीटीआयच्या अध्यक्षाविरुद्ध इस्लामाबादमधील मरगल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, इम्रान खान यांनी त्यांचे विशेष सहाय्यक शाहबाज गिल यांच्यासमवेत एकता रॅली काढली, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला की, कोठडीत त्यांचा छळ केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT