S. Jaishankar Dainik Gomantak
ग्लोबल

India Is Not Xenophobic: ‘’भारत हा झेनोफोबिक देश...’’; बायडन यांच्या वक्तव्यावर जयशंकर स्पष्ट बोलले

Manish Jadhav

India Is Not Xenophobic: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. जो बायडन (Joe Biden) यांनी भारतासह अनेक देशांचे वर्णन 'झेनोफोबिक' म्हणून केले होते, जे स्थलांतरितांचे त्यांच्या भूमीवर स्वागत करत नाहीत. इतकेच नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढत असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, बायडन यांच्या या वक्तव्यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला असून शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या एका मुलाखतीत एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सर्वांचे लक्ष या वस्तुस्थितीवर केंद्रित केले की, भारताने नेहमीच विविध समुदयातील लोकांचे आपल्या देशात स्वागत केले आहे. बायडन यांच्या अर्थव्यवस्थेच्या वक्तव्याबाबत जयशंकर म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे.

एस जयशंकर यांनी समर्पक उत्तर दिले

इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘’गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी भारत पाचव्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनला. दशकाच्या समाप्तीपूर्वी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे.’’ 2 मे रोजी एका निवेदनात अध्यक्ष बायडन म्हणाले होते की, ‘’तुम्हाला माहिती आहे का? आपली अर्थव्यवस्था वाढण्यामागे तुम्ही आणि इतर अनेक कारणे आहेत. यापैकी एक कारण म्हणजे आपण स्थलांतरितांचे स्वागत करतो. चीन आर्थिकदृष्ट्या इतका संकुचित का झाला? जपानलाही का समस्या येत आहेत? भारतालाही समस्यांचा का सामना करावा लागतोय? कारण एकच आहे ते म्हणजे त्यांना आपल्या देशात स्थलांतरित नको आहेत.’’

CAA चे उदाहरण दिले

दरम्यान, बायडन यांच्या ‘झेनोफोबिक’च्या दाव्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, 'भारत हा नेहमीच एक अतिशय अनोखा देश राहिला आहे... मी खरे तर असे म्हणेन की, विविध समुदयातील लोक भारतात राहतात.' परराष्ट्रमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) उदाहरण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर केलेला CAA कायदा भारताचा स्वागतार्ह दृष्टीकोन कसा प्रतिबिंबित करतो यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, 'मोदी सरकारने CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) कायदा लागू केला, जो संकटात सापडलेल्या लोकांसाठी आपल्या देशाचे दरवाजे उघडतो. मला वाटते की, ज्यांना भारतात येण्याची गरज वाटते, जे भारतात येण्याचा दावा करतात त्यांचे आपण स्वागत करतो.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT