S Jaishankar: ''पूर्वीच्या सरकारमधील परराष्ट्र धोरणात मुस्लिम तुष्टीकरणाची झलक''; जयशंकर यांचं मोठं वक्तव्य (WATCH)

S Jaishankar: लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले.
S. Jayshankar
S. JayshankarDainik Gomantak

S Jaishankar: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे, भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधक जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले. याआगोदरच्या सरकारच्या काळात कशाप्रकारे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण केले जात होते यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, आधीच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही याचा परिणाम दिसून येत होता असेही त्यांनी सांगितले. मी याआधी IFS अधिकारी होतो, म्हणून मी सांगू शकतो की यापूर्वी मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावरही दिसून येत होता.

'टॉप अँगल विथ सुशांत सिन्हा' या कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, ''पूर्वीच्या सरकारांकडून देशात आणि बाहेरही व्होट बँकेचे राजकारण केले जात होते. यापूर्वीच्या सरकारांनी असा कोणताही कठोर निर्णय घेतला नाही, ज्यामध्ये मुस्लिम व्होट बँकेचा विचार केला गेला नसेल.''

S. Jayshankar
S Jaishankar: ''भारताला UNSC चे स्थायी सदस्यत्व मिळेल, पण...''; जयशंकर यांनी सांगितले काय करावे लागणार

जयशंकर यांनी पाकिस्तानचे उदाहरण देऊन स्पष्ट केले

जयशंकर म्हणाले की, 'पूर्वीचे सरकार मुस्लिम तुष्टीकरणाच्या नावाखाली राजकारण करत होते.' ते पुढे म्हणाले की, ''पूर्वीच्या सरकारचे पाकिस्तानबाबचे धोरण आणि आजचे पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण यात जमीन आस्मानाचा फरक आहे असे तुम्हाला वाटत नाही का? यापूर्वी, पाकिस्तानबाबत बनवलेल्या परराष्ट्र धोरणात तुम्हाला व्होट बँक धोरणाची झलक दिसली नाही का?''

S. Jayshankar
S jaishankar: 'मानवतावादी कायद्यांचे पालन करणे इस्रायलची जबाबदारी', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

जयशंकर पुढे म्हणाले की, ''इस्रायल 1948 साली स्वतंत्र झाला, मात्र 1992 पर्यंत तिथे भारतीय दूतावास नव्हते. भारताने आपला राजदूतही तिथे पाठवला नाही. 1992 मध्ये जेव्हा भारताने इस्रायलमध्ये राजदूत पाठवला तेव्हा 2017 पर्यंत एकाही भारतीय पंतप्रधानाने इस्त्रायलला भेट दिली नव्हती. इस्रायल हा खूप मोठा देश आहे. इस्रायलशी भारताचे संबंध आणखी चांगले राहिले असते.'' ते पुढे म्हणाले की, ''राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपण इस्रायलसारख्या देशाला दूर ठेवतो. आताही जेव्हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आपल्याच देशातील काही पक्ष हा 'दहशतवादी हल्ला' नसल्याचे म्हणत होते. त्यामुळे अशा पक्षांच्या राजकारणाचा आधार काय आहे, हे आता अवघ्या जगाला कळले आहे.''

दुसरीकडे, 2014 पासून भारताच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या बदलावर प्रकाश टाकताना जयशंकर यांनी नमूद केले की, 'दहशतवादाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आता लक्षणीय बदल झाला आहे. मोदी सरकारच्या काळात भारतीय परराष्ट्र धोरणातही अमूलाग्र बदल झाला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com