Jennifer Barreto Miss Universe 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

Jennifer Barreto Miss Universe 2026: प्यूर्टो रिकोने रचला इतिहास! 75व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत जेनिफर बॅरेटोने पटकावले विजेतेपद; मायभूमीतच मिळवले यश VIDEO

Jennifer Barreto Wins 75th Miss Universe 2026: यंदाच्या 75व्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले.

Manish Jadhav

Jennifer Barreto Wins 75th Miss Universe 2026: यंदाच्या 75व्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले. 24 नोव्हेंबर रोजी सॅन जुआन येथील कोलिसेओ दे प्यूर्टो रिको होजे मिगुएल अ‍ॅग्रेलोट स्टेडियममध्ये रंगलेल्या सोहळ्यात तिने हा किताब जिंकला. जगभरातील 115 स्पर्धकांना मागे सोडत तिने हे यश संपादन केले, तर डॉमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ हिने पहिले उपविजेतेपद पटकावले.

घरच्या प्रेक्षकांसमोर मिळालेल्या या विजयामुळे प्यूर्टो रिकोने सहाव्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकत इतिहास रचला. याआधी 1970 मध्ये मारिसोल मालारेट, 1985 मध्ये डेबोरा कार्थी-ड्यू, 1993 मध्ये दयानारा टोरेस, 2001 मध्ये डेनिस क्विनोनेस आणि 2006 मध्ये झुलेयका रिवेरा यांनी प्यूर्टो रिकोला हा सन्मान मिळवून दिला.

सॅन सेबॅस्टियनचे प्रतिनिधित्व करणारी 27 वर्षीय जेनिफर हिचा प्रवास सर्वांसाठी खास ठरला. तिने फेब्रुवारी 2026 मध्येच रॅम्पवर पहिले पाऊल ठेवले आणि जूनमध्ये ती 'मिस युनिव्हर्स प्यूर्टो रिको 2026' ठरली. सौंदर्यस्पर्धांचा फारसा अनुभव नसतानाही तिने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवून बाजी मारली. विशेष म्हणजे ती विवाहित असून तिला पेनेलोप नावाची सात वर्षांची मुलगी आहे.

जेनिफरने मानसशास्त्र आणि समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2021 पासून तिने टेक्सासमधील फोर्ट कावाझोस येथे अमेरिकन लष्कराच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात काम करत घरगुती हिंसाचार आणि बाल अत्याचार पीडितांना मोठा आधार दिला. तसेच, तिने कार्ल आर डार्नल आर्मी मेडिकल सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले. या जागतिक मंचाचा वापर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोककल्याणाचे काम पुढे नेण्यासाठी करणार असल्याचे तिने सांगितले. स्पर्धेच्या अमृतमहोत्सवी वर्षी मिळालेल्या या विजयामुळे प्यूर्टो रिकोचा तब्बल वीस वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Robbery: 'एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या बहाण्याने पर्यटकाची लूट, रोशनीविरुद्ध न्यायालयाचा मोठा निर्णय

Jewellery Robbery: ओळखीचा फायदा घेत 75 वर्षीय वृद्धेला लुटले; सीसीटीव्हीमुळे महिला जेरबंद, 5 लाखांचे दागिने जप्त

Women Employment Schemes:16 सरकारी खाती, 60 योजना अन् 24 प्रशिक्षण संस्था; महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

कॅश व्हॅन लुटण्याचा डाव फसला अन् दरोडेखोर शिरले थेट सुपरमार्केटमध्ये, 25 जणांना ओलिस ठेवून केली 20 लाख डॉलरची मागणी; कोलंबियात थरार! VIDEO

Drug Case: कारमध्ये लपवला होता कोट्यवधींचा गांजा; पर्वरीत पोलिसांचा छापा, गुजरातचा युवक अटकेत

SCROLL FOR NEXT