IT Firms Slowing Hiring  Dainik Gomantak
ग्लोबल

Recession: आर्थिक मंदीची चाहूल, जगप्रसिद्ध कंपन्यांची कर्मचारी भरतीत कपात

अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या कर्मचारी भरतीवर पुनर्विचार करत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोना सारख्या जागतीक महामारीचा फटका सर्वदूर बसला आहे. वाढत जाणारी महागाई, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukrain War) यामुळे आर्थिक मंदीची (Recession) भीती वाढत चालली आहे. यामुळे अनेक जगप्रसिद्ध टेक कंपन्या त्यांच्या कर्मचारी भरतीचा (Hiring) पुनर्विचार करत आहेत. तसेच, कंपन्यांनी एकतर ऑफर फ्रीज केल्या आहेत किंवा रद्द केल्या आहेत.

गुगलची पॅरेंट (Google) कंपनी असलेली अल्फाबेट आयएनसीने (Albhapet Inc.) आपली कर्मचारी भरती थांबवली आहे. शॉपिंग जियांट असलेल्या अॅमेझॉनने (Amazon) त्यांचे काही गोडाऊन लिझने द्यायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात वाढ झाल्यानंतर जे जास्त कर्मचारी होते आणि ते कमी करणे आवश्यक होते. असे स्पष्टिकरण अॅमेझॉनने दिले आहे.

आयफोन कंपनी, अॅपलची (Apple) कर्मचारी भरती देखील मंदावली आहे. ऑनलाइन कार विक्रीच्या व्यवसायात असलेल्या कॅराव्हाना (Caravana) या कंपनीने मे महिन्यात 2,500 लोकांना कामावरून काढून टाकले. कंपानीने एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 12 टक्के कर्मचारी कपात केली आहे. क्रिप्टो करन्सी मधील कॉईनबेस ग्लोबल (Coinbase Global) या कंपनीने त्यांचे 18 टक्के कर्मचारी कपात केली आहे. रियल इस्टेट मधील कंपास या कंपनीने जवळजवळ 450 पदे काढून टाकत, 10 टक्के कर्मचारी कपात केली आहे.

क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) कंपनी जेमिनी ट्रस्ट, डिलिव्हरी कंपनी गो पफ या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी 10 टक्के कंपनी कर्मचारी कपात केल्याची माहिती आहे. याशिवाय लिफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म, मायक्रोसॉफ्ट कॉर्प्स, नेटफिक्स, पेलटॉन इन्टरॅक्टिव्ह, रेडफिन कॉर्प्स, रॉबिन मार्केट, रिवियान अॅटोमोटिव्ह, सेल्सफोर्स, स्फोटिफाय, टेस्ला, ट्विटर यासारख्या कंपन्यांनी देखील कर्मचारी कपातीबाबत निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

SCROLL FOR NEXT