Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 74 दिवसांत 19,000 हून अधिक मृत्यू… हमाससोबतचे युद्ध कधी संपणार, काय म्हणाले इस्रायलचे संरक्षणमंत्री?

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 74 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. गाझामध्ये आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 74 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. गाझामध्ये आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु हे युद्ध इतक्या लवकर संपणार नाही. गाझामध्ये सुरु असलेल्या बॉम्बस्फोटादरम्यान इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गॅलंट म्हणाले की, युद्ध संपायला वेळ लागेल. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.

याआधीही गॅलंट यांनी असेच वक्तव्य केले होते. इस्त्रायल सध्या गाझामधील युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे यावरुन दिसून येते. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, गाझामधील युद्ध अनेक महिने सुरु राहील. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही असे म्हटले आहे की, इस्रायल जोपर्यंत हमासला पूर्णपणे नष्ट करत नाही आणि त्यांच्या ओलीसांची सुटका करत नाही तोपर्यंत लढाई सुरुच ठेवेल. 10 आठवड्यांहून अधिक काळ सुरु असलेले हे युद्ध अखेर कधी संपेल? पुन्हा युद्धबंदी लागू करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची अद्याप चर्चा सुरु नाही. रविवारी उत्तर गाझामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात सुमारे 110 लोक ठार झाले.

ऑस्टिन योव गॅलंट यांना भेटले

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सोमवारी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझामधील इस्रायली कारवाया कमी करण्याबाबत चर्चा केली. ऑस्टिन आणि इतर यूएस अधिकाऱ्यांनी गाझामधील मोठ्या संख्येने नागरिकांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली, परंतु युद्धबंदीसंबंधी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणाले की, ही इस्रायलची कारवाई आहे. मी डेडलाइन किंवा अटी सेट करण्यासाठी इथे आलो नाही. अमेरिकन अधिकार्‍यांनी हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे, बोगदे नष्ट करणे आणि ओलीसांची सुटका करण्याच्या उद्देशाने लक्ष्यित ऑपरेशन्सचे आवाहन केले आहे. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीच्या आवाहनाला व्हेटो केला होता.

74 दिवस युद्ध चालू आहे

गाझामध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे आणि हे युद्ध कधी थांबेल हे सांगणे कठीण आहे. गाझामध्ये आतापर्यंत 1900 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT