Israel-Hamas War: इस्रायली लष्कराचा हमास दहशतवाद्याच्या घरावर छापा; दोन ब्रीफकेसमध्ये सापडली करोडोंची रोकड

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराची जमीनी कारवाई सुरुच आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराची जमीनी कारवाई सुरुच आहे. इस्रायली सैन्य IDF शहरभर हमास दहशतवाद्यांना निवडकपणे लक्ष्य करत आहे. दरम्यान, गाझामधील लोकांवर प्रथमच दया दाखवत IDF ने मदतीचा मार्गही खुला केला, जेथून अन्न, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. गाझामध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान इस्रायली लष्कराने हमासच्या वरिष्ठ कमांडरच्या घरावर छापा टाकला. येथून लष्कराने दोन ब्रीफकेसमधील कोट्यवधींची रोकड जप्त केली. आयडीएफचा दावा आहे की, दहशतवादी या निधीचा वापर मोठ्या गुन्ह्यांसाठी करणार होते. इस्त्रायली लष्कर या कारवाईला युद्धातील मोठे यश मानत आहे.

दरम्यान, इस्रायली लष्कर IDF ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये दोन ब्रीफकेसमध्ये मोठी रोकड दिसून येत आहे. आयडीएफने दावा केला आहे की, गाझामधील हमासच्या वरिष्ठ कमांडरच्या घरावर छापा टाकला, ज्यामध्ये ही मोठी रोकड सापडली. लष्कराने दहशतवाद्याचे नाव उघड केले नसले तरी ही रक्कम 5000000 NIS (इस्रायली चलन) असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 9 कोटी रुपये आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्त्रायली हल्ल्यात एकाच दिवसात 110 पॅलेस्टिनी ठार, हवाई हल्ले सुरुच!

दहशतवादी घटनांसाठी निधी

आयडीएफने दावा केला आहे की, हमासच्या वरिष्ठ दहशतवाद्याच्या घरातून जप्त केलेली रोकड दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाईल. आयडीएफचा आरोप आहे की, हमासचे दहशतवादी हे पैसे चुकीच्या कामांसाठी वापरत आहेत. तर, गाझामधील लोक भुकेने त्रस्त आहेत. गाझातील लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याऐवजी हमासचे दहशतवादी केवळ इस्रायलविरुद्ध कट रचून दहशतवादी कारवाया करत आहेत.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: युद्धामुळे इस्रायलचे आर्थिक संकट गडद, नेतन्याहू म्हणाले; ''जीडीपीच्या आणखी एक टक्का...''

इस्रायलने गाझातील लोकांवर हल्ले केले

याआधी, रविवारी इस्रायली लष्कराने गाझामधील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मार्ग खुला केला. हमाससोबतच्या युद्धात इस्रायलने गाझामधील लोकांना मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे, कारण गाझामधील भीषण हत्याकांड आणि रक्तपातामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणीही मिळत नाही. अलीकडेच, संयुक्त राष्ट्र संघानेही यावर चिंता व्यक्त करत युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. गाझामधील सातत्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीवर अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. जो बायडन यांनीही इस्रायल सरकारला जमिनीवरील हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला. गाझामध्ये झालेल्या भीषण हत्याकांडात किमान 20 हजार पॅलेस्टिनी मारले गेले, हे भयानक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com