Israel Hamas War
Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायली सैन्याचा अल शिफा हॉस्पिटलवर हल्ला, 20 ठार; हजारो लोकांनी घेतलाय आश्रय

Manish Jadhav

Attack in Gaza:

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायली सैन्याने सोमवारी पुन्हा एकदा गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाला लक्ष्य केले. एएफपीनुसार, हमास शासित भागातील सर्वात मोठ्या वैद्यकीय केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. हे केंद्र रुग्ण आणि विस्थापितांनी खचाखच भरलेले आहे.

इस्रायलने दावा केला की, हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणाच्या प्रयत्नात 20 पॅलेस्टिनी ऑपरेटिव्ह मारले गेले आणि अनेकांना ताब्यात घेण्यात आले. "ऑपरेशनदरम्यान आम्ही 200 हून अधिक संशयित दहशतवाद्यांना अटक केली," असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ते म्हणाले की, 'आम्ही रुग्णालयाच्या केंद्रात 20 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आणि रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात आणखी 20 दहशतवादी मारले गेले.'

दरम्यान, मृतांमध्ये फैक अल-मभौहचा समावेश आहे. हगारी यांच्या मते, 'हमासच्या (Hamas) अंतर्गत सुरक्षा संघटनेतील विशेष ऑपरेशन्सचा तो प्रमुख होता.' एएफपीच्या म्हणण्यानुसार, गाझा पोलिसांच्या एका सूत्राने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की माबोह फोर्समध्ये तो ब्रिगेडियर जनरल होता.

इस्रायली सैन्याने नोव्हेंबरमध्ये रुग्णालयावर हल्ला केला होता

दुसरीकडे, इस्त्रायली सैन्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये अल शिफा रुग्णालयावर हल्ला केला होता. हमासने रुग्णालयाच्या (Hospital) आत आणि खाली कमांड सेंटर बांधल्याचा दावा लष्कराने त्यावेळी केला होता. लष्कराला काही भूमिगत खोल्यांकडे जाणारा बोगदा देखील सापडला. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या आतून शस्त्रे सापडली. तथापि, दाव्याच्या तुलनेत पुराव्याअभावी, टीकाकारांनी लष्करावर नागरिकांचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप केला.

हजारो लोकांनी रुग्णालयात आसरा घेतला

एपीच्या मते, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सुमारे 30 हजार लोक रुग्णालयात आश्रय घेत आहेत, ज्यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षिततेच्या शोधात घर सोडून पळून गेलेल्या लोकांचा समावेश आहे. रुग्णालयात आश्रय घेतलेल्या लोकांनी सांगितले की, रणगाडे आणि अवजड शस्त्रांनी सज्ज इस्रायली सैन्याने रुग्णालयाच्या संकुलाला वेढा घातला आणि सैन्याने रुग्णालयामधील लोकांवर गोळीबार केला. सैन्याने अनेक इमारतींना लक्ष्य केले आणि डझनभर लोकांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT