Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायलने गाझावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. दरम्यान, रमजानपूर्वी इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामासंबंधी करार होऊ शकतो. अमेरिका आणि कतार यांच्या मध्यस्थीने हा युद्धविराम सहा आठवड्यांचा असेल, असे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, एका रिपोर्टने खळबळ उडवून दिली आहे. UNWRA रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इस्रायली बंदिवासात गाझावासीयांचा छळ करण्यात आला. पॅलेस्टिनींना त्यांच्या बंदिवासात इस्रायली सैन्याकडून वाईट वागणूकीचा सामना करावा लागला. कोठडीत असताना इस्रायली सैनिकांनी त्यांचा छळ केल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अशा छळांमध्ये झोपू न देणे, नग्न करणे आणि कैद्यांना कुत्र्यांच्या गराड्यात सोडण्याचा समावेश आहे.
यूएनडब्ल्यूआरएचे प्रमुख फिलिप लझारीनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पॅलेस्टिनी कैद्यांना 'विविध प्रकारच्या गैरवर्तनाचा' सामना करावा लागतो, ज्यामध्ये इलेक्ट्रिक शॉकची धमकी देणे, नग्न करणे, झोपू न देणे आणि त्यांना घाबरवण्यासाठी कुत्र्यांच्या गराड्यात सोडणे समावेश आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, UNWRA ने फेब्रुवारीपर्यंत गाझा सोडलेल्या 1,002 कैद्यांपैकी 100 हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. यूएनडब्ल्यूआरएचे प्रमुख फिलिप लाझारीनी यांनी सांगितले की, आम्ही सुटका झालेल्या लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर ते कैद्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या ग्रुपसोबत शेअर केले आहेत. लाझारीनी यांच्या टिप्पण्यांमुळे इस्रायली अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. यूएन एजन्सीने 450 हून अधिक दहशतवाद्यांना कामावर ठेवल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेले अनेक दहशतवादी UNWRA मध्ये काम करतात असा इस्रायलचा आरोप आहे.
इस्रायली आयडीएफने लैंगिक शोषण किंवा कैद्यांचे इतर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तनाचे आरोप नाकारले आहेत. इस्रायलच्या आकडेवारीनुसार, हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,160 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात सुमारे 30,534 लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.