Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

इस्त्रायल सेनेची गाझा पट्टीत पुन्हा एकदा 'एअरस्ट्राइक'

इस्रायली युद्धनौकांनी शनिवारी पहाटे गाझा पट्टीतील (Gaza Strip) दोन ठिकाणांना लक्ष्य केले.

दैनिक गोमन्तक

मध्य पूर्वमध्ये हमास (Hamas) आणि इस्रायलमध्ये (Israel) पुन्हा एकदा तणाव दिसून येत आहे. इस्रायली युद्धनौकांनी शनिवारी पहाटे गाझा पट्टीतील (Gaza Strip) दोन ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, गाझामधून इस्रायलमध्ये आग लावून पाठवलेल्या फुग्यांना (Incendiary Balloons) प्रतिसाद म्हणून हे केले गेले. त्याने हमास लष्करी कंपाऊंड आणि रॉकेट लाँचिंग साइटला (Rocket launching site) लक्ष्य केले.

इस्रायलमध्ये चार आग लावलेले फुगे सोडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यात आग लागल्यानंतर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. मात्र इस्रायल किंवा गाझामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही. या एअरस्ट्राईकनंतर हमासने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी दुपारी गाझा पट्टीजवळील भागात पेटलेल्या फुग्यांमुळे चार आग लागल्याची माहिती दिली. या घटनेच्या दोन महिने आधी इस्रायल आणि हमास (इस्रायल-हमास युद्ध) यांच्यात 11 दिवसांचे युद्ध (Israel-Hamas War) झाले. 2007 मध्ये हमास सत्तेवर आल्यानंतर गाझामधील हे चौथे युद्ध होते.

नाकाबंदीबद्दल हमास संतप्त

इस्रायलने युद्धाच्या समाप्तीनंतर या प्रदेशातील नाकाबंदी समाप्त करण्यासाठी फारसे काही केले नाही. हेच कारण आहे की इस्त्रायलवर दबाव निर्माण करण्यासाठी आग लावणारे फुग्यांचा वापर करण्यात आला आहे. इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी फुग्यांची तुलना रॉकेटशी केली. इस्रायल आणि इजिप्तने गाझा नाकाबंदी केली आहे. यामध्ये, इस्रायल गाझाचा किनारा आणि हवाई क्षेत्र नियंत्रित करतो. शिवाय या प्रदेशात येणाऱ्या बाहेरच्या लोकांवर आणि वस्तूंच्या हालचालींवरही निर्बंध घालतो.

हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये वाद

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एक दिवस आधी लेबनॉनची अतिरेकी संघटना हिज्बुल्लाहने इस्रायलवर रॉकेट डागले. हिज्बुल्लाहने (hezbollah) म्हटले आहे की, हा हल्ला आदल्या दिवशी दक्षिण लेबनॉनवर इस्रायलयने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून होता. त्याचवेळी इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलच्या आर्मी रेडिओने म्हटले आहे की, सैन्याने इराण समर्थित हिजबुल्लाह गटाने दक्षिण लेबेनॉनच्या काही भागांवर शेल आणि तोफ बॉम्बने प्रत्युत्तर दिले. लेबनीजच्या एका सुरक्षा सूत्राने सांगितले की, लेबेनीज शहर शेबाजवळील अल-अर्कब परिसरातून रॉकेट डागण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT