हॉंगकॉंगवरील पकड मजबूत करण्यासाठी 'ड्रॅगन'कडून नवे कारस्थान 

China and HongKong
China and HongKong
Published on
Updated on

चीनने हॉंगकॉंग वरील आपली पकड अजून मजबूत करण्याचा चंगच बांधला असल्याचे दिसत आहे. कारण चीनने आता हाँगकाँगमधील निवडणूक प्रक्रियेत मोठा  बदल केल्याची माहिती मिळाली आहे. आणि या बदलानुसार बीजिंगशी निष्ठावंत असलेलाच आता हाँगकाँग मध्ये निवडणूक लढवू शकणार आहे. त्यामुळे चीनने हॉंगकॉंग वरील आपला ताबा अधिकच आवळला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (China has now made major changes to the electoral process in Hong Kong)

चीनने यापूर्वी हाँगकाँगच्या (Hong Kong) राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात मोठा बदल केला होता. आणि त्यानंतर आता थेट हाँगकाँगच्या निवडणूक प्रक्रियेत चीनकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. चीनने केलेल्या या कायद्यानंतर अमेरिका किंवा अन्य युरोपीय देशांकडून कोणतीही प्रतिक्रिया अजून तरी आलेली नसली तरी चीनच्या या खेळीमुळे इतर देशांशी चीनचा संघर्ष वाढू शकतो. हॉंगकॉंगच्या नवीन चिनी निवडणूक सुधारणांच्या योजनेवर अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज स्वाक्षरी केली. चीनच्या सरकारी माध्यमांच्या अहवालानुसार, हाँगकाँगच्या व्यवस्थेत झालेल्या या मोठ्या बदलामुळे स्थानिक संस्था केवळ देशभक्त लोकांद्वारेच काम करू शकणार असल्याचे म्हटले आहे. 

तर, दुसरीकडे हाँगकाँग मधील लोकशाहीवादी गट हा चीनने (China) केलेली खेळी ही हाँगकाँगमधील असंतोष दडपण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये 47 लोकशाही समर्थकांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आणि या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या सुधारणेनंतर चीनने हाँगकाँगच्या कारभारामधील त्रुटी दूर करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, या योजनेंतर्गत हाँगकाँग मधील निवडणुकांमध्ये केवळ चीनवर विश्वास ठेवणारे लोकच सहभागी होऊ शकणार आहेत. मात्र हाँगकाँगमध्ये चीनच्या या निर्णयाचा तीव्र विरोध होत आहे. चीनला आपल्या या योजनेतून हाँगकाँगमधील विरोध संपवायचा असल्याचे लोकशाहीवादी गटाने म्हटले आहे. याआधी चीनने हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला होता. आणि त्याच्या आधारावर चीनने हाँगकाँग पूर्णपणे गिळंकृत केले होते.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com