ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया, मानवतावादी मदतीसाठी मार्ग केला खुला!

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, हजारो पॅलेस्टिनींच्या मृत्यूनंतर इस्रायलने आता गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच चुकून आपल्याच लोकांना मारल्यानंतर इस्रायल अजूनही हमासवर हल्ले करत आहे. दरम्यान, जमिनीवरील हल्ले थांबवण्याचा सल्ला मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इस्रायलला दिला होता. मात्र, इस्रायलचे हे रुप हमासविरुद्धच्या युद्धात प्रथमच पाहायला मिळाले आहे. याशिवाय, ओलीसांच्या सुटकेसाठीही चर्चा सुरु आहे.

दरम्यान, गाझामध्ये सुरु असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली लष्कराला रविवारी हमासचा सर्वात मोठा बोगदा सापडला. हा बोगदा 4 किलोमीटरहून अधिक लांब आहे. इस्रायली लष्कराचा दावा आहे की, हमास या बोगद्याचा वापर दहशतवाद्यांना रसद पुरवण्यासाठी करत होता.

दुसरीकडे, आपल्या लोकांच्या हत्येनंतर जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत असताना इस्रायली लष्कराने गाझा पट्टीतील हा 4 किलोमीटर लांबीचा बोगदा शोधून काढला. काही दिवसांपूर्वी आयडीएफने गाझा पट्टीमध्ये तीन शटलर्स लोकांना गोळ्या घातल्या होत्या. विशेष म्हणजे, या लोकांनी इस्रायली सैन्याला पांढरे झेंडे दाखवले होते. आयडीएफने नंतर कबूल केले की, ते चुकून मारले गेले. मृत इस्रायली होते आणि हमासने त्यांना ओलीस ठेवले होते. इस्रायलने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

इस्रायलने युद्धात प्रथमच दया दाखवली

दरम्यान, हमाससोबत युद्ध सुरु झाल्यानंतर इस्रायलने पहिल्यांदाच दया दाखवली. रविवारी, गाझामध्ये मानवतावादी मदतीचा मार्ग खुला झाला. युद्ध सुरु झाल्यापासून प्रथमच, IDF ने इस्रायल-गाझा-इजिप्त त्रिपक्षीय सीमेवरील केरेम शालोम क्रॉसिंग उघडले जेणेकरुन गाझा रहिवाशांपर्यंत जीवनावश्यक वस्तू सहज पोहोचवता येतील. मात्र, या दयेच्या विरोधात इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भूभागावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते अधिक तीव्र केले. इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही किंमतीत हमासचा नायनाट करणे हे त्यांचे ध्येय आहे आणि ते थांबणार नाही. आपल्या ओलीसांची सुटका करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.

ओलिसांवरही चर्चा सुरु झाली

दुसरीकडे, ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायली लष्कर आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. गेल्या महिन्यात पाच दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान हमासने 100 ओलिसांना इस्रायलच्या स्वाधीन केले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गाझा सीमेवर शेकडो पॅलेस्टिनींना सोडले. तथापि, इस्रायली अधिकार्‍यांनी सांगितले की, दहशतवादी गट हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशाने त्यांचा लढा सुरुच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

SCROLL FOR NEXT