Israel Hamas War Latest Update
Israel Hamas War Latest UpdateDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्रायली सैन्याने आपल्याच तीन नागरिकांची केली हत्या; हमासने ठेवले होते ओलीस

Israel-Hamas War: गाझामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ओलीस मारले गेल्याचे सांगत इस्रायली लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Published on

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाचा आज 71 वा दिवस आहे. दरम्यान, उत्तर गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करताना इस्रायली लष्कराने मोठी चूक केली आणि आपल्याच तीन नागरिकांना गोळ्या घातल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, “घटनेचा आढावा घेतला जात आहे.''

दरम्यान, गाझामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ओलीस मारले गेल्याचे सांगत इस्रायली लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कराने शोक व्यक्त केला आणि पीडितांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले की या घटनेची "पूर्ण पारदर्शकतेने" चौकशी केली जाईल. लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले की, गाझामधील तीव्र चकमकीत तीन इस्रायली ओलीसांना धोका म्हणून ओळखले गेले होते, परिणामी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला आणि तिन्ही ओलीस ठार झाले.

दुसरीकडे, योथम हैम (28), समीर अल तलालका (25) आणि अलोन शमरीझ (26) अशी मृत ओलीसांची नावे आहेत. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांनी या सर्वांचे किबुत्झ केफार येथून अपहरण केले होते. ओलिसांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फॅमिली फोरम ऑफ होस्टेज अँड मिसिंग पर्सन्सने देखील ठार झालेल्या तीन ओलिसांच्या नावांची पुष्टी केली आणि शोक व्यक्त केला.

Israel Hamas War Latest Update
Israel-Hamas War: हमासची लोकप्रियता वाढली; 90 टक्के लोकांनी केली महमूद अब्बास यांच्या राजीनाम्याची मागणी

फॅमिली फोरमने सांगितले की, ''योतम एक प्रतिभावान संगीतकार आणि संगीत प्रेमी होता, तर समीर हा एक उत्साही बाइक रायडर होता जो मित्रांसोबत फिरण्याचा आनंद घेत असे. 26 वर्षीय अलोनचे कुटुंब आणि मित्रांनी त्याचे वर्णन एक बास्केटबॉल चाहता म्हणून केले आहे."

दुसरीकडे, गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यासाठी जागतिक दबावादरम्यान इस्रायलने लढा अधिक तीव्र केला आहे आणि हमासच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे. साधे कपडे घालणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांना ओळखण्यात अडचण येत असली तरी गेल्या 24 तासांत इस्रायलने हमासच्या 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 19,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. आतापर्यंत 110 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com