Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, गेल्या आठवड्यात इस्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्निया आणि माजी प्रमुख योसी कोहेन यांनी आखाती देश कतारचा सिक्रेट दौरा केला. गाझा पट्टीत हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी हा दौरा केला.
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, मोसाद चीफ बर्निया यांनी कतारचा दौरा केला. ते मोसादचे माजी प्रमुख कोहेन यांच्यासोबत खासगी विमानाने कतारला गेले होते. या काळात मोसादचे प्रमुख आणि माजी प्रमुख कतार सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांना भेटले होते.
मात्र, या काळात त्यांच्यासोबत असलेल्या इस्रायली शिष्टमंडळातील अन्य सदस्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. KAN च्या वृत्तानुसार, मोसाद चीफ डेव्हिड आणि माजी संचालक योसी कोहेन यांना घेऊन जाणाऱ्या विमानाने रविवारी उड्डाण केले.
हे विमान कतारची (Qatar) राजधानी दोहा येथे उतरले होते. मात्र, ओलीसांच्या सुटकेबाबत दोन्ही बाजूंनी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इस्रायल (Israel) आणि कतार यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान, जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संस्था मानल्या जाणाऱ्या मोसादचे प्रमुख आणि माजी प्रमुख यांचा कतारचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी कतारची मध्यस्थी आवश्यक मानली जात आहे.
दरम्यान, 229 इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडण्यासाठी इस्रायलच्या पंतप्रधानांवर दबाव वाढत आहे. यामुळेच इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी कतारची मदत घेण्याचे ठरवले.
या संदर्भात, मोसाद प्रमुखाला कतारला पाठवण्यात आले जेणेकरुन ओलिसांच्या सुटकेबाबत तोडगा निघू शकेल. कतारने यापूर्वी अनेकदा इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. आता अशा आव्हानात्मक परिस्थितीत इस्रायलला पुन्हा एकदा कतारची मदत घ्यावी लागली आहे.
दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून 5 हजारांहून अधिक रॉकेट इस्रायलवर डागली. यानंतर लगेचच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या दोन आठवड्यांच्या युद्धात गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या 8306 झाली आहे. गाझातील 23 लाख नागरिकांपैकी निम्म्या नागरिकांनी आतापर्यंत घरे सोडली आहेत. या युद्धात 1400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
तर दुसरीकडे, हमासने 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात 50 हून अधिक ओलीसांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.