Israel-Hamas War: 'माझं चुकलं मला माफ करा...', नेतन्याहू यांनी गुप्तचर यंत्रणांची मागितली माफी

PM Netanyahu: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा रविवार हा 23 वा दिवस आहे.
Benjamin Netanyahu
Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War PM Netanyahu Apologized To Heads Of Intelligence Agencies: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा रविवार हा 23 वा दिवस आहे. मित्रपक्ष आणि विरोधकांकडून तीव्र टीकेचा सामना करत असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एका जुन्या विधानाबद्दल सुरक्षा दलांची माफी मागितली आहे.

ते म्हणाले की, मी चुकलो.... मी ज्या गोष्टी बोललो त्या बोलायला नको होत्या म्हणून मी माफी मागतो. मी सर्व सुरक्षा दलांच्या प्रमुखांना पाठिंबा देतो. 7 ऑक्टोबर रोजी हमासचा हल्ला रोखण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल नेतान्याहू यांनी ठपका ठेवला होता.

दरम्यान, बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या जुन्या वक्तव्याची पोस्ट काढून टाकली आहे. ते म्हणाले की, ''मी सुरक्षा दलांच्या सर्व प्रमुखांना पूर्ण पाठिंबा देतो. मी IDF चीफ ऑफ स्टाफ आणि IDF कमांडर आणि सैनिकांना पाठिंबा देतो जे इस्रायलसाठी लढत आहेत.''

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: 'नेतान्याहू देखील दहशतवादी...,' हमासच्या मुद्यावरुन तुर्कीचा इस्रायलवर हल्लाबोल

नेतान्याहू यांनी हा आरोप केला होता

यापूर्वी, नेत्यान्याहू यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले होते की, 'त्यांना हमासच्या हल्ल्यासंबंधी अवगत केले गेले नाही. गुप्तचर प्रमुख आणि शिन बेटच्या प्रमुखासह सर्व सुरक्षा दलांचे असे मत होते की, हमास घाबरला होता आणि त्याला तडजोड करायची होती.' मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका झाली. यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली.

Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षात मोठा ट्विस्ट? हमासचे शिष्टमंडळ रशियात दाखल

आम्ही आता युद्धात आहोत

या मोठ्या अपयशाची जबाबदारीही अनेक सुरक्षा प्रमुखांनी स्वीकारली होती, मात्र बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यासाठी कोणताही दोष स्वीकारण्याचे टाळले. या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले. आम्ही आता युद्धात आहोत आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही योग्य ती चौकशी करुन सर्व काही जनतेसमोर मांडू, असेही ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com