Halal Salmon Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू, जबालिया छावणीवर दुसरा हल्ला

Manish Jadhav

Israel Hamas War Updates Indian Origin Israeli Soldier Killed In Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आजचा 26 वा दिवस आहे. दरम्यान, भारतासाठी एक दु:खद बातमी आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय वंशाचा इस्रायली लष्करी कर्मचारी सार्जंट हलेल सोलोमन याचा मृत्यू झाला.

हलेल (20) हा दक्षिण इस्रायलमधील डिमोना शहराचा रहिवासी होता. या शहराला मिनी इंडिया' असेही म्हणतात. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने उत्तर गाझामधील जबालिया या सर्वात मोठ्या निर्वासित छावणीवर दुसरा हल्ला केला.

याआधी मंगळवारी रात्री गोळीबार झाला होता. या गोळीबारात हमासचा टॉप कमांडर इब्राहिम बियारी ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला होता. त्याचवेळी 50 सैनिकही मारले गेले.

महापौर म्हणाले - आमच्यासाठी आज दुःखद क्षण आहे...

डिमोना शहराचे महापौर बेनी बिटन यांनी फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये सार्जंट हलेल सोलोमन याच्या मृत्यूची पुष्टी केली. ते म्हणाले की, 'आमच्यासाठी आज दुःखद क्षण आहे.

हलेलचे आई-वडील, रोनित आणि मोर्दचाई आणि यास्मिन, हिला, वेरेड आणि शेक्ड या बहिणींच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हलेल हा एक अज्ञाधारक मुलगा होता, ज्याला आपल्या पालकांबद्दल आदर होता. त्याच्या निधनाने संपूर्ण डिमोना शहरावर शोककळा पसरली आहे.'

आतापर्यंत 11 इस्रायली सैनिक मारले गेले आहेत

डिमोना हे इस्रायलच्या (Israel) दक्षिणेस वसलेले शहर आहे. लोक याला 'मिनी इंडिया' असेही म्हणतात. या शहरात भारतातून आलेल्या ज्यूंची संख्या मोठी आहे. आयडीएफनुसार, या युद्धात आतापर्यंत 11 इस्रायली सैनिक मारले गेले आहेत.

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धाला आज 26 दिवस झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे 1400 इस्रायलचे लोक मारले गेले आहेत. युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत आहे.

इस्रायल गाझामधील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मंगळवारी इस्रायलने गाझातील सर्वात मोठे निर्वासित शिबिर असलेल्या जबालियावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये हमास कमांडर इब्राहिम बियारीसह सुमारे 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला.

तसेच, इस्रायलच्या बॉम्बफेकीमुळे वाढत्या मानवतावादी संकटाचा सामना करणार्‍या गाझातील लोकांसाठी धार्मिक, नैतिक, मानवतावादी आणि राष्ट्रीय जबाबदारीच्या भावनेतून हे हवाई हल्ले करण्यात आले, असे द टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.

मंगळवारी इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हौथी संघटनेने इलियट शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता, जो हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

SCROLL FOR NEXT