Israel-Hamas War: सॅनिटरी पॅड्स नाही… पाणी नाही…; पॅलेस्टिनी महिला मासिक पाळी टाळण्यासाठी खातायेत गोळ्या

Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन 25 दिवस झाले आहेत. आज युद्धाचा 26 वा दिवस आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War Latest Update Palestinian Women Uses Period Delaying Pills: इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन 25 दिवस झाले आहेत. आज युद्धाचा 26 वा दिवस आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मोठ्या संख्येने महिला, मुले आणि वृद्धांना संयुक्त राष्ट्रांच्या शिबिरांमध्ये पाठवले जात आहे.

शिबिरांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम आजारी आणि गर्भवती महिलांवर झाला आहे.

अन्न, पाणी, औषध या मूलभूत सुविधांअभावी महिलांना मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागत आहेत. यातील अनेक मुली अशा आहेत, ज्यांना पहिल्यांदा मासिक पाळी येऊ लागली आहे.

शिबिरांमध्ये पाणी, वीज आणि सॅनिटरी नॅपकिन नाहीत

अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरातील अनेक पॅलेस्टिनी महिला हल्ल्यांमुळे मासिक पाळी टाळण्यासाठी गोळ्या खात आहेत. तज्ज्ञांच्या मते या गोळ्यांमुळे शारीरिक समस्या आणि असह्य वेदनांचा धोका वाढला आहे.

या सर्व महिला (Women) विस्थापित झाल्यामुळे मोठी गर्दी असलेल्या शिबिरांमध्ये राहत आहेत. या शिबिरांमध्ये ना प्रायव्हसी आहे, ना पाणी ना मासिक पाळीची प्रोडक्ट्स.

Israel Hamas War
Israel-Hamas War: मोसाद प्रमुखांची कतारला 'सिक्रेट भेट', इस्रायल-हमास युद्धात नवा ट्विस्ट

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गोळ्या घेतायेत

दरम्यान, या सर्व उत्पादनांच्या कमतरतेमुळे महिला नोरेथिस्टेरॉन गोळ्या घेत आहेत. ज्या सहसा गंभीर मासिक पाळीच्या आणि वेदनादायक परिस्थितीत घेतल्या जातात. आत्तापर्यंत 14 लाखांहून अधिक लोक गाझा पट्टीतून विस्थापित झाले आहेत.

हे सर्वजण संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) शिबिरांमध्ये राहत आहेत. जिथे गोपनीयतेच्या संरक्षणासाठी जागा नाही. शिबिरांमध्ये राहणाऱ्या महिलांनी सांगितले की, त्यांना मासिक पाळीच्या वेदना सहन करण्यासाठी गोळ्यांचा सहारा घ्यावा लागत आहे.

Israel Hamas War
Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायली लष्कराचा धडका, हमासचा टॉप कमांडर ठार

दुसरीकडे, इस्त्रायली हल्ल्यात आतापर्यंत 8 हजाराहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले आहेत. दरम्यान, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत प्रवेश केला असून हमासच्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com