Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसीय 'युद्धविराम'; पहिल्या तुकडीत 13 ओलिसांची सुटका होणार!

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात शुक्रवारी सकाळपासून चार दिवसीय युद्धविराम सुरु झाला.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात शुक्रवारी सकाळपासून चार दिवसीय युद्धविराम सुरु झाला. यानंतर, ओलिस नागरिक आणि पॅलेस्टिनी कैद्यांची दुपारी सुटका केली जाईल. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

कतारच्या (Qatar) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता युद्धविराम सुरु झाला. यानंतर पहिल्या बॅचमध्ये 13 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. यामध्ये 13 महिला आणि बालकांना आज दुपारी 4 वाजता सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, मुक्त करण्यात येणाऱ्या कैद्यांची यादी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादकडे पाठवण्यात आली आहे.

कतारच्या प्रवक्त्याने दोहामध्ये सांगितले की, गाझामध्ये मदत पोहोचणे अपेक्षित होते आणि ओलिसांची पहिली तुकडी स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता सोडली जाईल. येत्या चार दिवसांत एकूण 50 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या बॅचमध्ये आज संध्याकाळी 13 महिला आणि मुलांना सोडण्यात येणार आहे.

पॅलेस्टिनींचीही इस्रायलच्या तुरुंगातून सुटका करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मोसाद सोडल्या जाणार्‍या कैद्यांची यादी देईल. दोन्ही याद्यांची पुष्टी झाल्यानंतर आम्ही लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु करु.

याआधी, 22 नोव्हेंबर रोजी (बुधवारी) एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले होते की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता युद्धविराम सुरु होईल, त्यानंतर गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या सुमारे 50 महिला (Women) आणि मुलांची सुटका केली जाईल. त्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनींनाही सोडणार आहे. मात्र, ही सर्व तयारी ही युद्धविराम सुरु होण्यापूर्वी बुधवारी रात्री उशिरा पुढे ढकलण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT