Israel-Hamas War: हमासच्या 'या' मास्टरमाइंडचा इस्रायल घेतोय वेड्यासारखा शोध, तो का आहे नंबर वन टार्गेट?

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Yahya Sinwar
Yahya Sinwar Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या महिन्यात हमासने इस्रायलवर क्रूर हल्ला केला, ज्यात सुमारे 1400 लोक मारले गेले. तेव्हापासून इस्रायल हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझावर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझामधील 12 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.

इतकेच नाही तर इस्त्रायली सैन्य हमासच्या सुरंगावर हल्ले करत आहे कारण त्यांना संशय आहे की त्यांचे कमांडर इथे लपले आहेत. सध्या इस्रायली लष्कर हमासचा मास्टरमाइंड याह्या सिनवारचा शोध घेत आहे, जो गाझा पट्टीतील एका सुरंगात लपला असल्याचे समजते.

दरम्यान, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात सिनवारचा मोठा हात होता असे इस्रायली एजन्सींचे म्हणणे आहे. याशिवाय, तोच दहशतवादी (Terrorist) आहे ज्याने इस्रायलच्या डोळ्यात धूळफेक केली. इस्रायलचे म्हणणे आहे की, याह्या सिनवारने हमासला युद्ध नको आहे आणि तो युद्धविरामाच्या बाजूने आहे, असे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला होता.

एका इटालियन पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता की, मला आता युद्ध नको आहे. मला युद्धबंदी हवी आहे. गाझा पट्टीचा सिंगापूर आणि दुबईसारखा विकास व्हावा, अशी त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.

Yahya Sinwar
Israel-Hamas War: इस्रायल हल्ल्यात उत्तर गाझा उद्ध्वस्त, अनेक हमास कमांडर ठार; आता पलटवारचा नवा प्लॅन...

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायली एजन्सीचे म्हणणे आहे की, याह्या सिनवारचे असे वक्तव्य दिशाभूल करण्यासाठी होते. एकीकडे हमास शांततेच्या बाजूने असून त्याचे लक्ष गाझा पट्टीवर असल्याचे त्यांनी इस्रायलला सांगितले. दुसरीकडे, तो इस्रायलवर हल्ला करण्याच्या रणनीतीमध्येही गुंतला होता. अमेरिका आणि युरोपीय संघ हमासला दहशतवादी संघटना मानतात. पण गेली काही वर्षे ते स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते की, त्यांचा भर दहशतवादापेक्षा प्रशासनावर अधिक आहे.

इस्रायली अधिकार्‍यांना आता असे वाटते की, हमासने एक भ्रम निर्माण केला होता, ज्यामुळे सरकारचे लक्ष त्याच्यावरील कमी झाले आणि त्याने दहशतवादी हल्ला केला.

इस्रायलचे लष्करी विश्लेषक चेन आर्टझी यांनी सांगितले की, लष्करी गुप्तचरांचे लक्ष इराण आणि सीरियाकडे वळले. यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनला आपल्या अस्तित्वाला धोका म्हणून पाहिले नाही. दुसरे विश्लेषक, मायकेल मिल्स्टाइन म्हणाले की, ''सिनवारला इस्रायलची मानसिकता चांगलीच ठाऊक होती. याचाच फायदा त्याने घेतला.''

Yahya Sinwar
Israel-Hamas War: इस्रायल हल्ल्यात उत्तर गाझा उद्ध्वस्त, अनेक हमास कमांडर ठार; आता पलटवारचा नवा प्लॅन...

इस्रायली सैन्याला कसे गोंधळात टाकले आणि हल्ला केला

ते पुढे म्हणाले की, हमासने (Hamas) गाझामध्ये स्थिरता हवी आहे हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. नागरिकांचे जीवनमान सुधारायचे आहे. यामुळे इस्रायली सरकारचे लक्ष बदलले. याच परिस्थितीचा फायदा घेत हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला.

मात्र आज इस्रायलने गाझाचे मोठे नुकसान केले आहे, परंतु हिटलरसारखा लपून बसलेल्या याह्या सिनवारचा शोध अजूनही सुरुच आहे. सध्या इस्रायली सैन्य याह्याचा सुरुंगापासून ते सुरुंगापर्यंत शोध घेत आहे. तो इस्रायली लष्कराचा नंबर वन टार्गेट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com