Israel-Hamas War: सध्या जगभरात इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचीच चर्चा आहे. यातच आता, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) द्वारे एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये त्यांना गाझामधील अल-शिफा रुग्णालयाच्या खाली एक बोगदा सापडला आहे.
या बोगद्यात स्नानगृह, स्वयंपाकघर, मीटिंग रुम अशा सुविधा उपलब्ध होत्या. IDF च्या म्हणण्यानुसार, हमास हजारो पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल बनवून इस्रायलवर हल्ले करत आहे. आता आयडीएफने या प्रकरणी गाझाच्या अल-शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलेम्यासह काही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी गाझामध्ये सुरु करण्यात आलेल्या इस्रायली सैन्याच्या जमिनीवरील हल्ल्याच्या मुख्य केंद्रांपैकी हे रुग्णालय (Hospital) आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार हमास अल-शिफा रुग्णालयाच्या खाली कमांड सेंटर चालवतो. रुग्णालयाच्या आत अनेक पॉइंट्स आहेत, ज्यातून या कमांड सेंटरमध्ये प्रवेश करता येतो.
तथापि, इस्रायलने केलेले हे आरोप हमास तसेच पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालय आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार फेटाळले आहेत. आयडीएफने अनेक निवेदनांमध्ये दावा केला आहे की, 7 ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या ओलीसांना रुग्णालयाच्या खाली असलेल्या त्याच बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले होते.
इस्त्रायली सरकारच्या एका सूत्राने सांगितले की, त्यांचा विश्वास आहे की हा करार शुक्रवारपर्यंत पुढे आला आहे. युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यात, हमास गाझामधून 50 ओलिसांची सुटका करेल आणि इस्रायल 150 पॅलेस्टिनी बंदिवानांना सोडेल.
हे रुग्णालय दोन्ही बाजूंच्या युद्धगुन्ह्यांच्या आरोपांचे केंद्रबिंदू बनले आहे. पॅलेस्टिनी लोक म्हणतात की, इस्रायलने रुग्णालयांना लक्ष्य केले आहे, तर इस्रायलचे म्हणणे आहे की या साइट्सचा उपयोग हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.