Iran Refinery Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Lavan Island Refinery Attack Iran: अमेरिका-इराण यांच्यात जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच सुरुंग लागला.

Manish Jadhav

Lavan Island Refinery Attack Iran: अमेरिका-इराण यांच्यात जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच सुरुंग लागला. या कराराला काही तास उलटत नाहीत तोच, बुधवारी इराणमधील लावन बेटावर असलेल्या एका मोठ्या तेल रिफायनरीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने आता खाडी देशांवर विशेषतः कुवेत आणि यूएईवर क्षेपणास्त्र हल्ले करत पलटवार केल्याने आखाती देश पुन्हा एकदा युद्धाच्या भडक्यात सापडले आहेत.

इराणच्या (Iran) तेल मंत्रालयाचे अधिकृत न्यूज आउटलेट 'शाना' ने दिलेल्या माहितीनुसार, लावन बेटावरील या रिफायनरीवर स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता भीषण हल्ला झाला. इराणने याला थेट 'शत्रूचे कृत्य' असे संबोधले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र रिफायनरीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अवघ्या काही तासांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या शांततेची घोषणा केली होती.

या शस्त्रसंधीच्या बदल्यात इराणने 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' तात्काळ प्रभावाने जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याचे मान्य केले. त्या बदल्यात ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची आपली जुनी धमकी मागे घेतली. एवढचं नाहीतर ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर या कराराचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. मात्र, आता हा करार केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे दिसून आले. इराणने केवळ रिफायनरी हल्ल्याचा आरोप अमेरिकेवर केला नाही, तर कुवेत आणि यूएई मधील लष्करी तळांना लक्ष्य करुन प्रत्युत्तर दिले.

या नव्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले. युनायटेड अरब अमिरातीने आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कुवेतमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेली 15 दिवसांची मुदत संपण्यापूर्वीच हा करार मोडीत निघाल्याने आता अमेरिका यावर काय अधिकृत भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. तुर्तास, शांततेच्या वाटाघाटींऐवजी आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा तोफांचा गडगडाट ऐकू येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT