Couple Caned For Adultery In Indonesia Dainik Gomantak
ग्लोबल

Crime News: दया-याचनेची विनवणी ठरली निष्फळ! वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसल्यानं जोडप्याला भयानक शिक्षा; शरिया नियमांचं उल्लंघन ठरलं जीवघेणं

Couple Caned For Adultery In Indonesia: इंडोनेशियातील आचे प्रांतात शरिया कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या एका क्रूर शिक्षेने जगभरात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

Couple Caned For Adultery In Indonesia: इंडोनेशियातील आचे प्रांतात शरिया कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या एका क्रूर शिक्षेने जगभरात खळबळ उडवून दिली. बांदा आचे शहरात व्याभिचाराच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या एका जोडप्याल्या जाहीरपणे प्रत्येकी 100 कोडे मारण्यात आले. गुरुवारी (17 सप्टेंबर) सार्वजनिक ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत ही शिक्षा सुनावण्यात आली. कोडे मारले जात असताना पीडित महिला असह्य वेदनेने विव्हळत होती आणि शिक्षा थांबवण्याची गयावया करत होती. अखेर वेदना सहन न झाल्याने ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरिया कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर या जोडप्याला प्रत्येकी 100 कोडे मारण्याची शिक्षा झाली होती. शिक्षेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, तर पुरुषाला 60 कोडे मारल्यानंतर त्याची शिक्षा काही काळासाठी स्थगित करण्यात आली, जेणेकरुन तो उर्वरित 40 कोडे खाण्यासाठी शारीरिकदृष्ट्या बरा होऊ शकेल. या जोडप्याव्यतिरिक्त इतर आठ जणांना वाढदिवसाच्या पार्टीत भिन्न लिंगी व्यक्तींशी मिसळल्याच्या क्षुल्लक कारणावरुन 16 ते 21 कोडे मारण्यात आले.

आचे हा इंडोनेशियातील (Indonesia) असा एकमेव प्रांत आहे, जिथे शरिया आधारित कडक नियम अधिकृतपणे लागू आहेत. येथे दारु पिणे, जुगार खेळणे, व्याभिचार आणि अश्लीलता यांसारख्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते. काही आठवड्यांपूर्वीच टिकटॉक लाईव्हस्ट्रीमदरम्यान कथित अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरुन एका महिलेला जाहीरपणे कोडे मारण्यात आले होते, जिथे तीही बेशुद्ध झाली होती.

या अमानुष आणि क्रूर प्रथेवर जगभरातील मानवाधिकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि युमन राईट्स वॉच या संस्थांनी जाहीरपणे कोडे मारण्याच्या या प्रथेला अत्यंत क्रूर, अपमानकारक आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकांच्या विरोधात असल्याचे म्हटले. मात्र, दुसरीकडे आचे प्रांतातील अधिकाऱ्यांनी या शिक्षेचे समर्थन करताना, ही आपल्या धार्मिक ओळखीची अभिव्यक्ती आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT