Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

Indonesia Landslide Death: इंडोनेशियातील जावा बेटावर निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळत आहे.
Indonesia Landslide Death
Indonesia LandslideDainikm Gomantak
Published on
Updated on

Indonesia Landslide Death: इंडोनेशियातील जावा बेटावर निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भीषण भूस्खलन आणि महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरे चिखलाखाली गाडली गेली आहेत. बचाव पथकाने बुधवारी शोधमोहीम पुन्हा सुरु केल्यानंतर आणखी चार मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही 82 लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावे चिखलाच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली

सोमवारी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे मध्य जावा प्रांतातील पेकालोंगन रीजेंसीमधील नऊ गावांत नद्यांचे पाणी शिरले. डोंगराळ भागातील गावांमध्ये भूस्खलन झाल्याने मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने जारी केलेल्या फोटोंमध्ये दृश्य अत्यंत भयावह दिसत आहेत. एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आणि शेतजमिनी आता गडद तपकिरी चिखलाच्या ढिगाऱ्यात बदलल्या आहेत. घरे, रस्ते आणि पूल झाडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे दबले गेले आहेत.

Indonesia Landslide Death
Indonesia Bus Accident: इंडोनेशियात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! भरधाव बस दुभाजकाला धडकून उलटली; 16 प्रवाशांचा मृत्यू, 18 गंभीर जखमी VIDEO

मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे (BNPB) प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, पेटुंगक्रियोनो रिसॉर्ट परिसरात भूस्खलन झाल्याने दोन घरे आणि एक कॅफे चिखलाखाली गाडले गेले. या आपत्तीत एकूण 25 घरे, एक धरण आणि गावांना जोडणारे तीन महत्त्वाचे मुख्य पूल उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेत किमान 13 लोक गंभीर जखमी झाले असून सुमारे 300 नागरिकांना सरकारी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

Indonesia Landslide Death
Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

82 जणांचा शोध सुरुच

पश्चिम जावा प्रांतातील वेस्ट बांडुंग जिल्ह्यातील पासिर लंगू गावात सर्वात जास्त नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पहाटे 3 च्या सुमारास गाढ झोपेत असताना डोंगराचा कडा कोसळल्याने 34 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. अब्दुल मुहारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथक अजूनही 82 बेपत्ता नागरिकांचा ढिगाऱ्याखाली शोध घेत आहे. आतापर्यंत पासिर कुनिंग गावातून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. माती आणि दगड इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत की, यंत्रसामग्री नेणे कठीण होत असून बचावकर्ते हाताने आणि कुदळीने खोदकाम करत आहेत.

Indonesia Landslide Death
Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

बचाव कार्यात हवामानाचा अडथळा

पश्चिम जावा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे प्रमुख टेटेन अली मुंग्कु एंगकुन यांनी सांगितले की, "जमिनीची अस्थिरता आणि सातत्याने होणारा पाऊस यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत." डोंगराचा भाग पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याने भूस्खलन (Landslide) क्षेत्रापासून 100 मीटरच्या परिघात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये मान्सूनच्या काळात दरवर्षी अशा घटना घडतात, कारण लाखो लोक धोकादायक डोंगराळ भागात किंवा पूरप्रवण मैदानी प्रदेशात वास्तव्य करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com