Vivek Ramaswamy Dainik Gomantak
ग्लोबल

US President पदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Ashutosh Masgaunde

Indian-origin candidate Vivek Ramaswamy, who is contesting the US presidential election, has received death threats:

अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारे भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. टायलर अँडरसन असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार, अँडरसनने आगामी कार्यक्रमासाठी दोन आश्चर्यकारक संदेश जारी केले. आरोपीने त्याच्या पहिल्या संदेशात म्हटले आहे की, 'छान, माझ्यासाठी उमेदवाराचे डोके उडवण्याची चांगली संधी आहे.' त्याच्या दुसऱ्या मेसेजमध्ये तो म्हणाला, 'मी यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ठार करीन.' रामास्वामी यांच्या टीमने या धमकीवर प्रतिक्रिया देत पोलिसांना माहिती दिली.

अँडरसनच्या अटकेनंतर रामास्वामी यांनी कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, 'आमच्या अवतीभवती असलेल्या सुरक्षा पथकाचा मी ऋणी आहे. मला सुरक्षित ठेवण्याचे काम ते करत आहेत.

संबंधीत गुन्ह्याच्या प्रकरणी अमेरिकेत असलेल्या कायद्याप्रमाणे या प्रकरणात, अँडरसनला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास, तीन वर्षांची पर्यवेक्षी सुटका आणि $250,000 पर्यंत दंड होऊ शकतो.

विवेक रामास्वामी हे भारतीय-अमेरिकन तंत्रज्ञान उद्योजक आहेत. ते सध्या रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दावा करत आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार म्हणूनही रामास्वामी यांची वर्णी लागली आहे. 37 वर्षांचे रामास्वामी पालकांबरोबर भारताच्या केरळ राज्यातून अनेक दशकांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत.

उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्यावरही रामास्वामींचा प्रभाव आहे. मस्क यांनी एकाच दिवसात दोनदा रामास्वामींची स्तुती केली यावरून याचा अंदाज लावता येतो.

त्यांच्या एका पोस्टमध्ये मस्क यांनी रामास्वामी हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अत्यंत आशादायक उमेदवार असल्याचे वर्णन केले आहे. त्याच वेळी, मस्क यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की रामास्वामी त्यांचे मत स्पष्टपणे सांगतात.

रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर आहेत. रिपोर्टनुसार, लोकांची दुसरी पसंती रॉन डीसँटिस आणि तिसरी पसंती विवेक रामास्वामी आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांचा सामना करत आहेत. असे खरेच घडले तर रॉन डीसँटिस आणि रामास्वामी यांच्यातील अध्यक्षीय निवडणुकीची शर्यत खूपच प्रेक्षणीय ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT