
पणजी: गोवा सरकारने सरकारी नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता राज्यातील सर्व रिक्त सरकारी पदे गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत भरली जाणार आहेत. या आयोगाने आतापर्यंत ७५२ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून, त्यापैकी ५० निवडक उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण करून आपापल्या नोकरीत रुजूही झाले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोवा सरकारने भरती प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी संगणकावर आधारित परीक्षा पद्धतीचा अवलंब केला आहे. या परीक्षांचे निकाल तात्काळ उपलब्ध होणार असल्याने, भरती प्रक्रियेला गती मिळेल आणि गैरव्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे सर्व सरकारी भरती प्रक्रिया गोवा कर्मचारी निवड आयोगाकडूनच हाताळल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोकर भरतीतील अनियमितता दूर करून, गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे योग्य आणि पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या काळात, सरकारी विभागांमधील उर्वरित सर्व रिक्त पदेही याच आयोगामार्फत भरली जातील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.