पुतिन यांचे कट्टर विरोधक Alexei Navalny तुरुंगातून बेपत्ता, विरोधी पक्षनेत्याच्या दाव्याने रशियात खळबळ

Putin: 2020 मध्ये नवलनी यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. फ्लाइटमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.
Alexei Navalny|Putin|Russia
Alexei Navalny|Putin|RussiaDainik Gomantak
Published on
Updated on

Putin's staunch opponent Alexei Navalny missing from prison, opposition leader's claim sparks uproar in Russia:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक Alexei Navalny जवळपास आठवडाभरापासून बेपत्ता आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलनीच्या वकिलांनी त्याच्याशी आठवडाभर चर्चा केलेली नाही. कैद्यांच्या यादीतूनही त्याचे नाव गायब आहे.

मॉस्कोच्या पूर्वेकडील तुरुंगात ठेवण्यात आलेल्या नवलनीला या वर्षी ऑगस्टमध्ये अतिरेकी आरोप आणि इतर गुन्ह्यांमध्ये 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नवलनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहणार होते, मात्र त्यांना कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. विजेच्या समस्येमुळे नवलनींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हरजर करता आले नाही, असा युक्तिवाद तुरुंग अधिकाऱ्यांनी केला.

नवलनी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी सांगितले की, नवलनी सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. वारंवार प्रयत्न करूनही वकील तुरुंगात असलेल्या नवलनी यांना भेटू शकले नाहीत आणि नवलनी तुरुंगात नसल्याचे सांगण्यात आले.

यार्मिश म्हणाल्या की, वकिलांना कळविण्यात आले आहे की नवलनी यापुढे कैद्यांच्या यादीत नाही. त्यांना दुसऱ्या कोणत्या तुरुंगात हलवण्यात आले हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

Alexei Navalny|Putin|Russia
Israel Hamas War: सीरियाच्या राजधानीवर इस्रायलचा जोरदार हल्ला, लष्करी तळांना केले लक्ष्य

दरम्यान, मॉस्को टाईम्सच्या वृत्तात नवलनी यांच्या टीमचा हवाला देत तुरुंगात असलेल्या रशियन विरोधी पक्षनेत्याची तब्येत खूपच खराब असल्याचे म्हटले आहे.

नवलनीच्या भ्रष्टाचार विरोधी फाउंडेशन बोर्डाच्या अध्यक्षा मारिया पेवचिख म्हणाल्या, "आम्हाला कळले की, गेल्या आठवड्यापासून Alexei Navalny गंभीर आरोग्य समस्येने त्रस्त आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आले आहे. त्याच्या वकिलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे."

Alexei Navalny|Putin|Russia
Israel Hamas War: "तर एकही ओलीस जिवंत ठेवणार नाही," हमासचा इस्रायलला इशारा; गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरूच

पुतिन यांच्या कामावर सतत टीका करणाऱ्या नवलनी यांच्यावर 2017 मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न केला परंतु फसवणुकीच्या आरोपांमुळे ते निवडणुकीस उभे राहू शकले नाहीत. अलेक्सी नवलनी यांनी याला सरकारचे षडयंत्र म्हटले होते.

जुलै 2019 मध्ये, त्यांना 30 दिवस तुरुंगात टाकण्यात आले कारण त्याने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती.

2020 मध्ये नवलनी यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. फ्लाइटमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते अनेक दिवस कोमातही होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com