PAN PAN PAN: 191 प्रवाशांना घेऊन गोव्याला निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड येताच ओरडला पायलट, मुंबईत केलं इमर्जन्सी लँडिंग

Delhi Goa Flight Diverted: विमान हवेतच असताना तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री ९.५३ वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँड करण्यात आले.
Delhi Goa Flight Diverted
Pilot Pan pan pan CallDainik Gomantak
Published on
Updated on

बातमीबाबत थोडक्यात माहिती

१) दिल्लीतून गोव्याकडे येणारे इंडिगो कंपनीच्या विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

२) तांत्रिक अडचणीची माहिती मिळताच वैमानिकांने पॅन पॅन पॅन असा संदेश दिला होता.

३) दिल्लीतून १९१ प्रवाशांसह उड्डाण घेतलेले हे विमान गोव्यातील मोपा विमानतळावर लँड होणार होते.

मुंबई: दिल्लीतून गोव्याकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे रात्रीच्या सुमारास मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. इंडिगोच्या ६ई६२७१ या फ्लाईटमधून १९१ प्रवासी दिल्लीतून गोव्याकडे प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडानंतर विमान मुंबई विमानतळावर लँड करण्यात आले.

दिल्ली येथील इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन १९१ प्रवाशांना घेऊन इंडिगोचे विमान गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार होते. विमान हवेतच असताना तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री ९.५३ वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँड करण्यात आले. यावेळी पायलटने ‘पॅन पॅन पॅन’ असा कॉल दिला होता, अशी बातमी हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.

Delhi Goa Flight Diverted
Goa Congress: गोवा काँग्रेसमध्ये धुसफूस; भाजप माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या आमदाराची प्रदेशाध्यक्षांनी केली ठाकरेंकडे तक्रार

वैमानिकांनी दिलेला ‘पॅन पॅन पॅन’ हा कॉल एक अर्जंट संदेश असून जीवाला धोका नसणारा इमर्जन्सीचा इशारा असतो. इंजिन क्रमांक एकमध्ये आलेल्या बिघाडनंतर हा कॉल देण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

विमान हवेत असताना आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विमान वळवून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आले, अशी माहिती इंडिगो विमान कंपनीने दिली आहे.

नियमानुसार विमानाचे इमर्जन्सी लँडिगची माहिती मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावर रुग्णवाहिका आणि अग्निबंब स्टँडबाय ठेवण्यात आले होते. ९.५३ वाजता विमान सुरक्षितपणे विमानतळावर लँड करण्यात आले. विमानातील सर्व केबिन क्रू आणि प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

यानंतर विमानाची आवश्यक सर्व तपासणी करण्यात आली. देखभाल आणि दुरुस्ती केल्यानंतर विमान पुन्हा कार्यरत होईल, अशीही माहिती कंपनीने दिली.

Delhi Goa Flight Diverted
Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत कोकणीतून हवी चर्चा!

FAQ: Q/A

प्रश्न: दिल्लीतून गोव्यात येणारे इंडिगोचे विमान मुंबईत का उतरविण्यात आले?

उत्तर: तांत्रिक अडचणीमुळे गोव्याकडे येणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवून आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

प्रश्न: विमान वळविताना पायलटने कोणता कॉल दिला?

उत्तर: तांत्रिक अडचणीची माहिती मिळताच पायलटने पॅन पॅन पॅन असा कॉल दिला होता.

प्रश्न: पायलटने दिलेल्या पॅन पॅन पॅन कॉलचा अर्थ काय असतो?

उत्तर: ‘पॅन पॅन पॅन’ हा कॉल एक अर्जंट संदेश असून जीवाला धोका नसणारा इमर्जन्सीचा इशारा असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com