America Flights Dainik Gomantak
ग्लोबल

विमानात अल्पवयीन मुलीशेजारी हस्तमैथुन; भारतीय-अमेरिकन डॉक्टरला अमेरिकेत अटक

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने ही कारवाई केली.

Pramod Yadav

विमानात अल्पवयीन मुलीशेजारी हस्तमैथुन केल्याप्रकरणी भारतीय-अमेरिकन डॉक्टरला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने ही कारवाई केली.

युनायटेड स्टेट्स अॅटर्नी ऑफिसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात होनोलुलूहून बोस्टनला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. मॅसॅच्युसेट्समधील डॉ. सुदिप्ता मोहंती असे गुरुवारी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. "युनायटेड स्टेट्सच्या विशेष विमान कार्यक्षेत्रात असभ्य आणि अश्लील कृत्ये केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

डॉ. मोहंती बोस्टनमधील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये कार्यरत आहेत. मोहंती एका महिलेसोबत उड्डाण करत होते. विमानात ते एका 14 वर्षाच्या मुलीच्या शेजारी बसले होते. मुलगी तिच्या आजोबांसोबत प्रवास करत होती.

डॉ. मोहंती यांनी चेहरा झाकून घेतला होता तसेच, अंगावर शालसारखे पांघरून घेतले होते. दरम्यान, काही वेळानंतर डॉ. मोहंती अश्लील कृत्य करत असल्याचे मुलीच्या लक्षात आले.

बोस्टनमध्ये विमान उतरल्यानंतर मुलीने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. न्यूयॉर्क पोस्टनुसार, डॉ. मोहंती यांनी तपासादरम्यान आरोप फेटाळले आहेत, "मला या घटनेची कोणतीही आठवण नाही" असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT