धक्कादायक! 70 हजार रुपयांत खरेदी केली बायको, न सांगताच जाऊ लागली माहेरी म्हणून आवळला गळा

हत्या केल्यानंतर आरोपींने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला.
Delhi Murder Case
Delhi Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Murder Case: दिल्लीतून एक हृदयद्रावक हत्याकांड समोर आले आहे. एका व्यक्तीने 70 हजार रुपयांत चक्क बायको खरेदी केली. पण, पत्नी न सांगता वारंवार माहेरी जाऊ लागली, तेव्हा रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला.

दिल्लीतील फतेहपूर बेरी भागातील जंगलात एका महिलेचा मृतदेह पडला आहे. अशी माहिती एका अनोळखी व्यक्तीने फोन करून दिल्ली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

जंगलातून मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी या भागातून जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली, तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात शनिवारी रात्री 1.40 च्या सुमारास एक ऑटो त्या भागातून गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी ऑटोचा शोध घेतला असता त्याचा नोंदणी क्रमांकही सापडला. दिल्लीतील छतरपूर येथील गदाईपूर डॅम रोड परिसरात राहणारा अरुण हा ऑटो चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एकामागून एक रहस्ये बाहेर यायला सुरुवात झाली.

Delhi Murder Case
कुराणचा आयत सांगता न मौलवीने मारली 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या थोबाडीत, सहा तास करावी लागली शस्त्रक्रिया

मृत महिलेचे नाव स्वीटी असून, ती धरमवीर नावाच्या व्यक्तीची पत्नी होती. त्याचा मेहुणा धरमवीर आणि सत्यवान या दोघांनी मिळून स्वीटीची हत्या केली. असे अरुणने सांगितले. दिल्ली-हरियाणा सीमेजवळील नांगलोई भागात या तिघांनी स्वीटीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. असे अरुणने सांगितले.

पत्नी न सांगता तिच्या माहेरच्या घरी जात असे. यामुळे पतीचा तिच्यावर राग होता. असेही अरूणने सांगितले.

पोलिसांनी या हत्येप्ररकरणी पुरावे नष्ट केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. खुनात वापरलेली ऑटोही पोलिसांच्या ताब्यात आहे. धरमवीरने स्वीटीला विकत घेतले त्या व्यक्तीचाही पोलीस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Coconut Sale Two Rupee
Delhi Sexual Assault Case
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com