Operation Sindoor Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: भारतीय सैन्यानं घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला, 9 दहशतवादी तळं केले उद्ध्वस्त

India strike on Pakistan: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेतला आहे.

Sameer Amunekar

Operation Sindoor, India Attacks Pakistan

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे हवाई हल्ले त्या ठिकाणांवर करण्यात आले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात आलं होतं.

भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला.

भारतीय सैन्य दलानं या हवाई हल्ल्याआधी सोशल abpabpमीडियावरुन एक पोस्ट केली होती. “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” आणि Ready to Strike, Trained to Win”, असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळातच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पाकिस्तानकडून घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीय. ‘भारत माता की जय.’ असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याबाबत पोस्ट केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT