
मोरजी: पेडणेतील सीमेवरील तपास नाक्यांवर सध्या तपासणीच्या नावावर मालवाहू वाहने अडवून त्यांच्याकडून लाच घेउन वाहने सोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. पत्रादेवी व नईबाग तपास नाक्यांवरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. मात्र या दोन्ही नाक्यांवर तपासणीच्या लुबाडले जात आहे, असा मालवाहतूकदारांचा दावा आहे.
या दोन्ही नाक्यांवर रोज शेकडो वाहने अडवून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले जातात. केवळ पोलिसच नव्हे तर वाहतूक पोलिसही लाच घेतल्याशिवाय वाहने सोडत नसल्याचा या मालवाहतूकदारांचा दावा आहे.
गाडी तपास नाक्यावर अडवली गेल्यास ती सोडवण्यासाठी संबंधित गाडी मालकाला पोलिस, ट्रॅफिक विभाग आणि उपअधीक्षक कार्यालयातूनही फोन येतात, अशी माहिती काही वाहतूकदारांनी दिली.
विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱ्या रेती वाहतूकदारांची खूप साठवणूक केली जाते. प्रती ट्रक ठराविक रक्कम घेतल्याशिवाय ट्रक सोडले जात नाहीत. याबाबत हरकत घेतल्या वा तक्रार केल्यास उलट जास्त त्रास सहन करावा लागतो, असे काही ट्रकचालकांनी सांगितले.
या भ्रष्टाचारामुळे वाहतूकदार मानसिक व आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. यावर वेळीच आवर न घातल्यास सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वासच उडून जाईल, असे काही ट्रकचालकांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात तत्काळ लक्ष घालून चौकशी करावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या गोव्यातील मालवाहू वाहतूकदारांची खूप सतावणूक केली जाते. मात्र महाराष्ट्रातील वाहतूकदारांना वेगळी वागणूक मिळते. नाक्यावर पैसे दिले तरच प्रवेश मिळतो. -अविनाश शेट्ये, ट्रॅक चालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.