अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांची राजकिय सत्ता उलथवून टाकल्यानंतर तालिबानला स्व:ताचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच आता अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे बंधू हश्मत घनी (Hashmat Ghani) यांनी रविवारी सांगितले की, आम्ही देशातील अस्थिरता टाळण्यासाठी तालिबान्यांना "स्वीकारले" आहे मात्र त्यांना "समर्थन" दिले नाही. यासोबतच त्यांनी तालिबानशी संबंधांबाबत भारताला सल्लाही दिला आहे. हशमत घनी हा व्यवसायाने व्यापारी असून काही दिवसांपूर्वी तालिबानमध्ये सामील झाला आहे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, तालिबानशी राजकीय संबंध राखण्याशिवाय भारताकडे (India) दुसरा पर्याय नाही.
पुढे त्यांनी जगाला संबोधित करताना म्हटले, जरी ते तालिबानचे समर्थन करत नसले तरी त्याला स्वीकारले पाहिजे. हशमत यांनी तर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांना 'मूर्ख' म्हटले आहे. सालेह सध्या तालिबान विरोधी गटाचे नेतृत्व करत आहे. तालिबानमधील हशमत गनी यांना जेव्हा विचारण्यात आले की, त्यांनी तालिबान का स्वीकारला, तेव्हा ते म्हणाले की, ही अस्थिरता टाळण्यासाठी स्वीकारले गेले पाहिजे. हशमत (Hashmat Ghani in Taliban) पुढे म्हणाले, तालिबानला अफगाणिस्तानच्या सरकारची सूत्रे सोपवण्यासाठी त्यांना देशात राहणे आवश्यक आहे.
सरकारला सुरक्षेविषयी सांगितले
हशमत यांच्या मते, तालिबान स्वीकारण्यामागील एक कारण म्हणजे देशापुढील आर्थिक आणि राजकीय समस्यांपासून वाचवणे. कारण तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. "समर्थन" हा एक अतिशय शक्तिशाली शब्द आहे आणि तो तालिबानचे समर्थन करत नाही. अशरफ घनींच्या भावाने पुढे सांगितले की, 'त्यांना (तालिबान) सुरक्षेची जाणीव असून ते सहज हाताळू शकतात. मी व्यापारी आणि सुशिक्षित समाजाला थांबवण्यासाठी थांबलो आहे. अफगाणिस्तानमधून व्यापाऱ्यांचे जाणे हे दुखदायक आहे.
सालेह यांच्यावर जोरदार टीका केली
यानंतर त्यांनी अमरुल्ला सालेह यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सालेह यांना 'मूर्ख' असे म्हटले. तालिबानकडून ताब्यात घेतलेले प्रदेश परत घेण्यासाठी नॉर्दर्न अलायन्सचा कमांडर अहमद शाह मसूदचा (Ahmad Shah Massoud) मुलगा अहमद मसूदसोबत अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतात सालेह काम करत आहे. अशी माहिती आहे की, त्यांनी तालिबानकडून अनेक जिल्हे परत घेतले आहेत आणि अनेक तालिबान सैनिकांना ठार केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.