तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळायला हवी मात्र... :बोरिस जॉन्सन

अफगाणिस्तानमधील नवीन सरकारला 'आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळायला हवी मात्र एकतर्फा (Unilateral Recognition) मान्यता नको.'
Boris Johnson
Boris JohnsonDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सांगितले की, अफगाणिस्तानमधील नवीन सरकारला 'आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळायला हवी मात्र एकतर्फा (Unilateral Recognition) मान्यता नको.' कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी जॉन्सन जगातील इतर राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांच्याशी संपर्क साधण्यापूर्वी इम्रान खान यांच्याकडे तालिबानला मान्यता देण्याविषयी जॉन्सन बोलले आहेत.

ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहमध्ये अफगाणिस्तान संकटावर चर्चा झाली. दरम्यान ब्रिटिश संसदेने आपली उन्हाळी सुट्टी रद्द केली असून बुधवारी विशेष सत्राचे आयोजन केले आहे. डाउनिंग स्ट्रीट (British Prime Minister's Office) शी झालेल्या चर्चेबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, "पंतप्रधान (Johnson) अफगाणिस्तान आणि त्याच्या सभोवतालच्या क्षेत्राचे मानवीय आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांशी काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत."

Boris Johnson
अशरफ घनींनी देशाची फसवणूक केली; अफगाण दूतावासाने केली अटकेची मागणी

संपर्क ठेवण्याचे मान्य केले

"पंतप्रधान (जॉन्सन) यांनी अधोरेखित केले की अफगाणिस्तानातील नवीन सरकारला आंतरराष्ट्रीय आधारावर मान्यता दिली पाहिजे मात्र एकतर्फा (Pakistan and Taliban Relations) नाही." ते पुढे म्हणाले की, तालिबान सरकारची भविष्यातील कोणतीही वैधता आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे पालन आणि त्यांच्या सर्वसमावेशकतेवर अवलंबून असेल.

जो बायडनशी यांच्याशी संपर्क साधा

खान यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी संपर्क साधताना जॉन्सन यांनी अलिकडच्या काळात अफगाणिस्तानातून ब्रिटीश नागरिक तसेच माजी कर्मचारी आणि इतरांना बाहेर काढण्यात यूएस-ब्रिटिश सहकार्याचे आम्ही स्वागत करतो. डाउनिंग स्ट्रीट म्हणाले, "अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकटापासून अफगाणिस्तानला वाचवण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र येण्याची गरज आहे. यावर पंतप्रधान जॉन्सन आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सहमती दर्शवली." पंतप्रधान जॉन्सन यांनी ब्रिटनमधील काही भागांमध्ये मानवतावादी मदत (Humanitarian Crisis in Afghanistan) आणि निर्वासितांचे पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे.

Boris Johnson
अफगाणिस्तानची मदत फक्त 'मोदी'च करु शकतात; भारतातल्या अफगाणिंनी व्यक्त केली आशा

कोणत्या निर्वासितांना प्राधान्य मिळेल?

निवेदनात म्हटले आहे की, अफगाण नागरी पुनर्वसन योजना (Afghan Refugees in UK) अंतर्गत तालिबानकडून सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करणाऱ्या महिला, मुली, धार्मिक आणि इतर अल्पसंख्याकांना ब्रिटन प्राथमिकता देईल. योजनेची घोषणा करताना जॉन्सन म्हणाले, "अफगाणिस्तानला एक शांत देश बनवण्यासाठी ज्यांनी आमच्याबरोबर गेल्या 20 वर्षांत काम केले. त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत." त्यापैकी अनेकांना, विशेषत: महिलांना त्वरित मदतीची गरज आहे. मला अभिमान आहे की ब्रिटनने त्यांच्या कुटुंबाला आपल्या देशात सुरक्षित राहण्यासाठी हा मार्ग तयार केला आहे.

Boris Johnson
'या' तालिबानी नेत्याचं काय आहे भारतीय कनेक्शन; जाणून घ्या

गृहमंत्री प्रिती पटेल काय म्हणाल्या?

ही योजना अद्याप अंतिम झालेली नाही. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल (Home Minister Preeti Patel) यांनी बुधवारी पुष्टी केली की ते "पूर्व-अटींवर आधारित" असेल आणि येत्या काही वर्षांत 20,000 अफगाण निर्वासितांना येथे आणण्यात येण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी पहिल्या वर्षी 5 हजार निर्वासित पात्र असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com