South Korea Birth Rate 
ग्लोबल

Bonus For Giving Birth: ऐकवे ते नवलचं! मुलं जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या देताहेत 62 लाखांपर्यंत बोनस

Ashutosh Masgaunde

In South Korea Bonus up to Rs 62 lakh to employees for giving birth to childrens:

दक्षिण कोरियातील कंपन्यांनी एक अणोखे धोरण बनवले आहे. जिथे अनेक मोठ्या कंपन्यांनी बर्थ प्रोग्रॅम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मुलांना जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या बोनस म्हणून 62 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम देत आहेत.

अहवालानुसार, दक्षिण कोरियातील जन्मदर येत्या काही वर्षांत विक्रमी नीचांकी गाठू शकतो, ज्यामुळे तेथील लोकसंख्याशास्त्रीय आव्हाने आणखी बिघडू शकतात.

नुकताच एक अंदाज जारी करताना, देशाच्या सांख्यिकी कार्यालयाने असे म्हटले होते की, प्रति स्त्री अपेक्षित बाळांची संख्या यावर्षी 0.72 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे आणि 2025 पर्यंत ती 0.65 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियामध्ये प्रजनन दर जगात सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत देशात अधिकाधिक मुले व्हावीत, यासाठी देशातील कंपन्यांनीही पुढे येऊन कर्मचाऱ्यांसाठी नवीन धोरणे आखली आहेत.

या दिशेने वाटचाल करत, दक्षिण कोरियाच्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुले जन्माला घालण्यासाठी 62 लाख रुपयांपर्यंतचा बोनस देत आहेत.

Booyoung Group आणि Sangbangwool या दोन कंपन्यांनी या महिन्यात त्यांच्या कार्यालयात नवीन बर्थ प्रोग्रॅम जाहीर केले आहेत. कंपन्यांनी सांगितले आहे की, देशाचा जन्मदर वाढवण्यासाठी 62 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे.

द कोरिया हेराल्डचा हवाला देत बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असे म्हटले आहे की, अंडरवेअर निर्मिती कंपनी सांगबंगवूलने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले की ते आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पहिल्या अपत्यासाठी सुमारे 18 लाख रुपये बोनस देतील. कंपनी दुसऱ्या अपत्यासाठीही सुमारे 18 लाख रुपये आणि तिसऱ्या अपत्यासाठी सुमारे 25 लाख देईल.

कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, कमी जन्मदरावर मात करणे हे आपल्या समाजासाठी सर्वात महत्त्वाचे काम बनले आहे. या उपक्रमात कंपनी जबाबदारी घेईल आणि देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

Ssangbangwool व्यतिरिक्त, अशीच घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला सोल-आधारित उत्पादन कंपनी, Booyoung Group ने केली होती.

कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति बालक 62 लाख रुपये बोनस देईल, असे सांगण्यात आले.

या बर्थ प्रोग्रॅमांतर्गत, बूयोंग ग्रुपने 2021 पासून ज्या कर्मचाऱ्यांना मुले झाली आहेत त्यांच्यासाठी बोनस वाढवला आहे.

अहवालानुसार, 2021 पासून पालक बनलेले 70 कर्मचारी आहेत आणि कंपनी या कर्मचाऱ्यांना सुमारे 43 कोटी रुपये रोख वितरीत करण्याची तयारी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT