H-1B Visa Dainik Gomantak
ग्लोबल

चलो अमेरिका! 2023 मध्ये 14 लाख भारतीयांना मिळाला US Visa

India-US: अमेरिकन दूतावासाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यूएस दूतावासाने पुढे माहिती दिली की, जगभरातील प्रत्येक 10 यूएस व्हिसा अर्जदारांपैकी एक भारतीय आहे.

Ashutosh Masgaunde

In 2023, US issued 1.4 million US visas, to Indians an all-time record:

2023 साली अमेरिकेने व्हिसाच्या बाबतीत भारतावर खूप मेहरबान होता. गेल्या वर्षी अमेरिकेने 14 लाख यूएस व्हिसा जारी केले, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. याशिवाय व्हिजिटर व्हिसाच्या अपॉइंटमेंटसाठी लागणारा वेळही 75 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

अमेरिकन दूतावासाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यूएस दूतावासाने पुढे माहिती दिली की, जगभरातील प्रत्येक 10 यूएस व्हिसा अर्जदारांपैकी एक भारतीय आहे.

यूएस दूतावासाने म्हटले की, "2023 मध्ये, भारतातील यूएस दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी विक्रमी 14 लाख यूएस व्हिसा जारी केले, जे 2022 च्या तुलनेत 60 टक्के अधिक आहेत. जगभरातील प्रत्येक 10 पैकी एक व्हिसा अर्जदार भारतीय आहे.

त्याच वेळी, प्रक्रिया आणि स्टाफिंग सुधारण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे देशभरातील व्हिसिटर व्हिसासाठी अपॉइंटमेंटची प्रतीक्षा वेळ सरासरी 1,000 दिवसांवरून फक्त 250 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे आणि सर्व श्रेणींमध्ये किमान प्रतीक्षा वेळ आहे.

भारतातील यूएस दूतावासाने 2023 मध्ये 14,00,000 हून अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केले, ज्याने जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा सलग तिसऱ्या वर्षी विक्रम केला. व्हिसा प्रक्रियेत जगातील अव्वल चार विद्यार्थी मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई येथील आहेत. यामुळे भारतीय विद्यार्थी हे युनायटेड स्टेट्समधील आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गट बनला आहे. युनायटेड स्टेट्समध्ये शिकणाऱ्या 10 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण एक चतुर्थांश आहे.

पुढे असेही सांगण्यात आले की या वर्षी एक पायलट कार्यक्रम सुरू केला जाईल, ज्याद्वारे H1B व्हिसाधारक त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करू शकतील.

मुंबई दूतावासाने महामारीमुळे विलंब झालेल्या 31,000 हून अधिक स्थलांतरित व्हिसा प्रकरणे संपवली. ज्यांच्याकडे इमिग्रंट व्हिसाची याचिका प्रलंबित आहे आणि ते शेड्यूलिंगच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना आता मानक, प्री-पँडेमिक अपॉईंटमेंट विंडोमध्ये अपॉइंटमेंट मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT