Ram Mandir उद्घाटनापूर्वीच उद्योगांची भरारी, मुंबई-गोरखपूर खासगी विमानाचे भाडे 61 लाख रूपये

Ram Mandir Inauguration: दुसरीकडे स्थानिक दुकानांमध्ये सोन्याचा मुलामा असलेल्या मूर्ती संपल्या आहेत. त्यांना एवढी मागणी आहे की, त्या जवळपासच्या बाजारपेठेतही मिळेना झाल्या आहेत.
Ayodhya Ram Mandir Inauguration And Bussiness
Ayodhya Ram Mandir Inauguration And BussinessDainik Gomantak
Published on
Updated on

Even before the inauguration of Ram Mandir, there is a rush of industries, Mumbai-Gorakhpur private plane fare is 61 lakh rupees:

रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनामुळे अयोध्येत उद्योग आणि व्यावसाय क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. येथील विमानतळावरील पार्किंग पूर्णपणे खाजगी विमानांनी भरलेले आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई-गोरखपूर खासगी विमानाचे प्रवास भोडे तब्बल 61 लाख रूपये असल्याचे समोर आले आहे.

तसेच स्थानिक दुकानांमध्ये सोन्याचा मुलामा असलेल्या मूर्ती संपल्या आहेत. त्यांना एवढी मागणी आहे की, त्या जवळपासच्या बाजारपेठेतही मिळेना झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुमारे 8,000 व्हीव्हीआयपी सोमवारी राम लल्लाच्या अभिषेकसाठी अयोध्येत पोहोचणार आहेत.

या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे हे एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे, असे भारतीय लक्झरी चार्टर सर्व्हिस क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितले. अयोध्येला जाण्यासाठी त्यांची सर्व विमाने बुक करण्यात झाली आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration And Bussiness
व्यापाऱ्यांची भरभराट! Ram Madir उद्घाटन संबंधित साहित्याचा एक लाख कोटींहून अधिक व्यवसाय

22 जानेवारीला अयोध्या विमानतळावर 100 खाजगी विमाने उतरतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे त्याच्या पूर्ण क्षमतेने भरेल. येथून कारने सुमारे चार तासांच्या अंतरावर असलेले वाराणसी विमानतळ देखील पूर्णपणे जेटने भरले जाणे अपेक्षित आहे. तसेच, अयोध्येपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या गोरखपूर विमानतळावर जेटची आवक सुरू झाली असून, तेही पूर्णपणे भरले जाईल.

मुंबई-गोरखपूर रिटर्न जेटचे भाडे ६१ लाख रुपये

फाल्कन 2000 जेटमधील नऊ प्रवाशांसह मुंबई-गोरखपूर परतीच्या फ्लाइटचे भाडे सुमारे 61 लाख रुपये असू शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. तथापि, लक्झरी चार्टर सेवा क्लब वन एअरने कोणताही खुलासा केलेला नाही.

Ayodhya Ram Mandir Inauguration And Bussiness
आयोध्येतील किराणा दुकाणांमध्ये का वाढला Cold Drinks आणि Salty Snacks चा साठा ? वाचा नवे अर्थकारण

दुसरीकडे काही किरकोळ विक्रेते म्हणतात की, त्यांच्याकडे सोन्याचा आणि सोन्याचा मुलामा असलेल्या राम मूर्ती आणि कलाकृतींचा साठा संपला आहे. ज्यांची किंमत 30,000 ते 2.20 लाख रुपयांपर्यंत आहे.

लखनऊमधील एचएस ज्वेलर्सचे व्यवस्थापक बलदेव सिंग म्हणाले की, मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही थायलंडमधूनही आयात केली आहे. ग्राहक भेटवस्तू देण्यासाठी आणि घरात ठेवण्यासाठी ते खरेदी करत आहेत. सध्या दोन आठवड्यांची प्रतीक्षा यादी आहे.

जमिनीच्या किमती वाढल्या

काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आयोध्येत जमिनीची सरासरी किंमत आता जवळपास नऊ पटीने वाढली आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 14 कोटी रुपयांना 10,000 चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. लोक आर्थिक सुबत्तेवर पैज लावत आहेत पण अयोध्येच्या कथेचा भाग बनण्यासाठी ते व्यावसायिक पद्धतीने त्यांची भावनिक जोडही जोपासत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com